काय सांगता! ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ मधील सर्किटने मेडिकल कॉलेजमधल्या नर्सशीच केले होते लग्न; इतक्या वर्षांनी झालाय खुलासा


प्रदर्शनानंतर सिनेमे हे अनंत काळाची कलाकृती ठरतात. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण त्या सिनेमांना पाहू शकतो. आज तंत्रज्ञानामुळे तर चित्रपटांना जपून ठेवणे अधिक सोपे आणि सोयीस्कर झाले आहे. आजच्या सोशल मीडियाच्या जगात कधीही काहीही होऊ शकते. सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळे ट्रेंड सुरूच असतात. या सोशल मीडिया जगात जुन्या नवीन अशा सर्वच सिनेमांवर अनेकदा वेगवेगळे मिम्स किंवा जोक व्हायरल होताना आपण पाहिले आहे. काही दिवसांपूर्वीच शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या ‘विवाह’ सिनेमातील ‘जल लिजिए’ या संवादावर भरपूर मिम्स व्हायरल झाले होते. आता नेटकऱ्यांची नजर ‘मुन्नाभाई एम,बी.बी.एस’ या सिनेमावर पडली आहे.

साल २००३ मध्ये आलेला राजकुमार हिरानी यांचा ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ हा सिनेमा तुफान गाजला. या चित्रपटाने मैत्रीचा नवा अर्थ आणि खऱ्या मैत्रीचे उदाहरण लोकांपुढे ठेवले. मुन्ना म्हणजेच संजय दत्त आणि सर्किट म्हणजेच अर्शद वारसी यांची या चित्रपटातील मैत्री आणि त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. सिनेमाच्या शेवटी सर्व हॅपी एंडिंग दाखवताना संजय दत्तचे ग्रेसी सिंगसोबत लग्न झालेले दाखवले आणि सर्किटचे देखील एका मुलीसोबत लग्न दाखवले गेले. आता तुम्ही म्हणाल आम्हाला हे माहित आहे. हो पण पूर्ण वाचा.

चित्रपटात सर्किटने जिच्यासोबत लग्न केले ती दुसरी तिसरी कोणी नसून चक्क मुन्नाभाई शिक्षण घेत असलेल्या कॉलेजमधील नर्स आहे. विश्वास बसत नाही ना? मग जेव्हा हा सिनेमा लागेल तेव्हा नीट बघा. तर आता यावर आधारित एक फोटो सध्या व्हायरल होत असून त्यात लिहिले आहे की, “मुन्नाभाई चित्रपटातील सर्किटने नर्सशी लग्न केले हे कळायला तुम्हाला किती वर्षे लागली?” या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहे.

दरम्यान ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस.’ हा सिनेमा राजकुमार हिरानी याच्या उत्कृष्ट सिनेमांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाच्या यशानंतर हिरानी यांनी ‘लगे रहो मुन्नाभाई’ हा सिनेमा केला. हा देखील सुपरडुपर हिट झाला. आता प्रेक्षकांना या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘…चला परत जाऊया बालपणात’, म्हणत चित्र रंगवताना दिसली अभिनेत्री तेजश्री प्रधान

-हा नक्की फोटो आहे की व्हिडिओ? तेजस्विनी पंडितची लेटेस्ट पोस्ट पाहून चक्रावले नेटकरी

-‘३६५ डे’ फेम मिशेल मोरोनचे खासगी फोटो सोशल मीडियावर लीक; अभिनेत्याने पोस्ट शेअर करत व्यक्त केला राग


Leave A Reply

Your email address will not be published.