Wednesday, December 6, 2023

लग्नानंतर नयनताराचं बदललं आयुष्य म्हणाली, ‘महिलांवर बंधने का आहेत?’

दक्षिणमधील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा लग्न झाल्यापसून आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे खुपच चर्चेत असते. तिने आपल्या दमदार अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये वेगळीच ओळख निर्माण केली आहे असून तिला लेडी सुपरस्टार म्हणून ओळखलं जातं. अभिनेत्रीचा नवीन हॉरर चित्रपट ‘कनेक्ट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे अभिनेत्री चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चांगलीच तयारी करत आहे. नयनताराने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान तिने तिच्या लग्नानंतर आणि आई झाल्यानंतर तिचे आयुष्या होणाऱ्या बदलावर मोकळ्यापणाने सांगितले आहे.

नयनतारा (Nayanthara) आपल्या दमदार अभिनयासोबतच आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळेही प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते. तिचा आगामी येणारा चित्रपट ‘कनेक्ट’ (Connect) चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे. तसेच तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान तिचा पती विघ्नेश शिवन (Vghnesh Shivan) याचे कौतुक करत त्याला सपोर्ट सिस्टीम सांगितले आहे. याच वर्षी या दोघांनी अनेक वर्षाच्या नात्याला लग्नाच्या बंधनात अडकवले असून सरोगसीद्वारे हे दोघे जुळ्या मुलांचे आई-वडील झाले आहेत. यानंतर नयनताराचे आयुष्या खूप फुलले आहे. पतीचा पूर्ण पाठिंबा आणि जुळ्या मुलांची आई होणं अशी देन्ही सुखा तिला लाभली, याबद्दल अभिनेत्रीने एका मुलाखतीदरम्या सांगितले की, “महिलांवर बंधने का आहेत? मला वाटते हे चुकीचे आहे. लग्नानंतर महिलांना काम का करता येत नाही? पुरुष लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ऑफिसला जातात. लग्न हा मध्यांतराचा मुद्दा नाही.”

नयनताराने पुढे सांगितले की, “लग्नामुळे तुमचे पूर्णआयुष्य स्थिर होते. जेव्हा तुम्हाला असे वाटते तेव्हा तुम्हाला अधिक साध्य करायचे असते. मी आजवर भेटलेल्या सर्व महिलांमध्ये ही मानसिकता पाहिली आहे. माझ्यासाठी काहीही बदलले नाही. एका नव्या युगाची ही सुंदर सुरुवात आहे. मी अधिक साध्य करू शकते. मी चांगले चित्रपट बनवू शकते. कोणतेही नियम नसावेत. विवाह सुंदर आहे. तुम्ही का साजरा करू शकत नाही?”

विघ्नेश शिवन आणि नयनतारा यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर (दि, 9 जून 2022) रोजी विवाह उरकला. त्याशिवाय या जोडीने 6 वर्षापूर्वीच (दि, 11 मार्च 2016) रोजी पंजाकृती केली आणि ऑक्टोंबर 2022 मध्ये सरोगसीनुसार दोन जुडवा मुलांना जन्म दिला.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पद्मश्री पुरस्कार सन्मानित संगितकार काळाच्या पडद्याआड, कलाविश्वात पसरली शोककळा
अभिनेता गोविंदाचा या दिग्दर्शकाने केला होता घोर अपमान; म्हणाला, “ना हाईट, ना हिरोसारखं तोंड…”

हे देखील वाचा