जेव्हा रणबीरने न्यूयॉर्कमध्ये फायर अलार्म वाजूनव बोलावले होते फायर ब्रिगेड; आई नीतू कपूरने सांगितला किस्सा


सोनी टीव्हीवरील प्रसिद्ध रियॅलिटी ‘सुपर डान्सर 4’ हा शो प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. शोमध्ये असे काही स्पर्धक आहेत, ज्यांचा डान्स पाहून प्रेक्षक हैराण होतात. ‘सुपर डान्सर 4’ या शोचे परीक्षक अनुराग बासू, शिल्पा शेट्टी आणि गीता कपूर हे आहेत. या मंचावर पाहुणे देखील अनेकवेळा येत असतात. अशातच अभिनेत्री नीतू कपूर या मंचाला पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या. या वेळी नीतू कपूर यांनी मंचावर सगळे स्पर्धक आणि परीक्षकांसोबत डान्स केला. तसेच त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत मंचावर आठवणी शेअर केल्या. या शोमधील एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत. तसेच प्रेक्षक देखील या व्हिडिओला चांगला प्रतिसाद देत आहेत. (Neetu Kapoor share a childhood memories of ranbir kapoor on super dancer 4 stage)

नीतू कपूर यांनी यावेळी त्यांचा मुलगा आणि अभिनेता रणबीर कपूरबाबतच्या एका गोष्टीचा खुलासा केला, जेव्हा त्यांचे कुटुंब न्यूयार्कमध्ये होते. नीतू कपूर यांनी सांगितले की, रणबीर लहानपणी खूप मस्तीखोर होता. जेव्हा ही घटना घडली होती, तेव्हा त्यांचे संपूर्ण कुटुंब न्यूयार्कमध्ये होते. त्यावेळी रणबीरने फायर अलार्म बघितला आणि तो वाजवला होता.

नीतू कपूर यांनी सांगितले की, “त्याने फायर अलार्म बघितला आणि विचार केला असेल मी हे वाजवलं तर? आणि त्याने ते तसचं केलं. त्यानंतर अनेक फायर ब्रिगेडच्या गाड्या बिल्डिंगखाली आल्या होत्या. ते पाहून रणबीर खूप घाबरला होता. त्यावेळी तो कोणालाच काहीच बोलला नाही. तो शांतपणे त्याच्या आजीकडे गेला आणि म्हणाला हे सगळं मी केलं आहे, पण कोणाला काहीच सांगू नकोस.” या सोबतच त्यांनी सांगितले की, रणबीर कपूरचा पहिला पगार झाल्यानंतर त्याने त्यांच्यासाठी जेवण मागवले होते आणि त्यांच्या एका गाण्यावर डान्स देखील केला होता.

नीतू कपूर यांनी या शोचे परीक्षक अनुराग बासू यांच्या बाबत सांगितले की, “जेव्हा केव्हा पाहुणे येतात, तेव्हा दादा त्यांच्या सोबत डान्स करतात. मला त्यांचा रिदम खूप आवडतो. मी माझ्या मुलाच्या गाण्यावर त्यांच्यासोबत डान्स करू इच्छिते. नीतू कपूर यांनी केलेल्या या विनंतीचा मान ठेवून त्या दोघांनी मंचावर रणबीर कपूरच्या ‘गलती से मिस्टेक’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. त्यांचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. प्रेक्षक या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत.

या व्हिडिओवर एका युजरने कमेंट केली की, “या वयात देखील नीतू कपूर कमाल आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले, ‘स्वीट नीतू कपूर.” या एपिसोडमध्ये ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर भावुक होतात. सगळे स्पर्धक नीतू आणि ऋषी कपूर यांच्या रोमँटिक गाण्यावर डान्स करताना दिसले. सगळ्या स्पर्धकांनी उत्तम परफॉर्मन्स दिला, परंतु पतीच्या आठवणीत नीतू कपूर भावुक झाल्या. त्यांना पाहून मंचावरील सर्वांनाच अश्रू अनावर झाले. तसेच नीतू यांनी देखील एका गाण्यावर डान्स केला.

या आधी नीतू कपूर या सिंगिंग रियॅलिटी शो ‘इंडियन आयडल 12’ मध्ये आल्या होत्या. तिथे त्यांनी ऋषी कपूर यांच्या सोबतच्या रिलेशनबाबत सांगितले होते. नीतू कपूर या चित्रपटसृष्टीत कमबॅक करणार आहेत. त्या राज मेहता यांच्या ‘जुग जुग जियो’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात अनिल कपूर, वरुण धवन, कियारा आडवाणी सारखे कलाकार असणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘क्रेझी किया रे’, प्रिया बापटच्या दिलखुलास स्मितवर चाहते झाले फिदा

वयाच्या अवघ्या ९व्या वर्षी संगीतबद्ध केलं होतं पहिलं गाणं; तर बराच रंजक होता आर डी बर्मन यांचा जीवनप्रवास

‘माझा होशील ना’ फेम गौतमी देशपांडेच्या ग्लॅमरस लूकने चोरली लाखो मने; एक नजर टाकाच


Leave A Reply

Your email address will not be published.