अभिनेत्री विजयालक्ष्मीचा नवीन डान्स पाहून प्रेक्षक झाले थक्क; पाहा व्हिडिओ

Netizens Stunned Vijayalakshmi Rocking Dance Video Latest Bhojpuri South Ditish


दिग्दर्शक अगाथियान यांची मुलगी आणि अभिनेत्री विजयालक्ष्मी हिने व्यंकट प्रभू यांच्या ‘चेन्नई 600028’ पासून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. पुढे तिने ‘अंजथे’, ‘कटराथू कलवु’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय ती बिग बॉसच्या दुसर्‍या सिझनची वाइल्ड-कार्ड स्पर्धकही होती. विजयालक्ष्मी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते आणि बर्‍याचदा तिचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल होत असतात. प्रेक्षकही तिच्या पोस्टची वाट पाहत असतात. नुकत्याच आलेल्या तिच्या व्हिडिओला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.

वास्तविक हा एक डान्स व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये विजयालक्ष्मी जबरदस्त नाचताना दिसत आहे. व्हिडिओ पोस्ट करताना विजयालक्ष्मीने कॅप्शनमध्ये लिहले आहे, “जेव्हा तुम्ही नियमित वर्कआउट करता, तेव्हा तुम्हाला आत्मविश्वास मिळतो.”

विजयालक्ष्मी तिच्याशी आणि तिच्या कुटुंबियांशी संबंधित प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तसेच विजयालक्ष्मीने दिग्दर्शक फिरोजशी लग्न केले आहे. काही काळापूर्वी, अभिनेत्री विजयालक्ष्मीने तिचे वडील म्हणजेच दिग्दर्शक अगाथियान यांचे अभिनंदन करण्यासाठी तिच्या मायक्रो-ब्लॉगिंग पेजवर पोस्ट केली होती. तिने वडिलांचे आभार मानले आणि म्हटले होते की, “आज मी जे आहे तुमच्यामुळेच आहे. मला अभिमान आहे की तुम्ही प्रथम व्यक्ती आहात ज्यांना तामिळमध्ये दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुरस्काराच्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावरील आनंद मला अजूनही आठवत आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर असा आनंद आम्ही कायम ठेवत राहू. मी तुमच्यामुळेे आज इथे आहे. धन्यवाद…”.

तिने ही पोस्ट ‘कदल कोट्टाई’ चे 25 वर्षे पूर्ण झाल्यावर लिहिली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-हे वाचलंत का? अंबानी कुटुंबाची सून होण्यापूर्वी ‘ती’ होती प्रसिद्ध अभिनेत्री; देव आनंद यांच्या ‘देस परदेस’ चित्रपटातून केली होती अभिनयाची सुरुवात
-Pran @101! जेव्हा मुलांचे नाव ‘प्राण’ ठेवण्यापासून घाबरू लागले होते लोक; ‘असा’ होता अभिनेत्याचा दरारा-वाढदिवस! लग्न समारंभात पाहताच क्षणी टीना मुनीम यांच्या प्रेमात पडले होते अनिल अंबानी; असे जुळले होते लग्न


Leave A Reply

Your email address will not be published.