बाप रे! ‘लागीर झालं जी’ मालिकेतील आज्या झाला ‘मजनू’, एकदा कारण तर वाचा


मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवीन चित्रपट येत आहेत. चित्रपटसृष्टीत सहसा प्रेमकथा असलेले चित्रपट येत असतात. अशातच आणखी एक प्रेमकथेवर आधारित चित्रपट येत आहे. खास गोष्ट म्हणजे या चित्रपटात टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय अभिनेता मुख्य भूमिकेत दिसणार आहे. झी मराठीवरील ‘लागीर झालं जी‘ (Lagir Jhal Ji) ही मालिका खूपच गजाली होती. भारतीय आर्मीची पार्श्वभूमी असलेल्या या मालिकेने हाहा म्हणता प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. या मालिकेत नितीश चव्हाण (Nitish chavhan) आणि शिवानी बावकर (Shivani Baokar)हे मुख भूमिकेत होते. याच मालिकेत आज्याची भूमिका साकारणारा नितीश आता चित्रपटात झळकणार आहे. त्याचा ‘मजनू’ हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकताच ‘मजनू’ या चित्रपटाचा पोस्टर आणि मोशन पोस्टर लाँच सोहळा मुंबईत संपन्न झाला. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित ‘मजनू’ या चित्रपटात अभिनेता नितीश चव्हाण, अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री स्वेतलाना अहिरे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ‘मजनू’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये नितीश चव्हाण हा रुबाबदारपणे घोड्यांमध्ये धावत आहे, तर रोहन पाटील आणि स्वेतलाना अहिरे हे एकमेकांसोबत दिसत आहेत. पोस्टर पाहून प्रेक्षकांना आता या चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे. शिवाजी दोलताडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. (Nitish Chavhan new dMajnu movie’s poster released)

या नवीन चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक शिवाजी दोलताडे म्हणाले की, ‘मजनू’ हे एक ग्रामीण बाज असलेल्या निमशहरी भागातील कथानक आहे. हळुवारपणे फूलणाऱ्या प्रेमकथेसोबतच प्रेक्षकांना उत्कंठावर्धक सस्पेन्स बघायला मिळणार आहे.”

चित्रपटातील खास गोष्ट म्हणजे चित्रपटाला उत्तम संगीत लाभले आहे. या चित्रपटातील गाणी अनेक प्रसिद्ध गायकांनी गायली आहेत. या चित्रपटातील गाण्यांना संगीतकार पी. शंकरम, सचिन अवघडे, साजन – विशाल यांनी संगीत दिले आहे. चित्रपटातील गाणी इंडियन आयडॉल फेम सलमान अली, आदर्श शिंदे, संदीप उबाळे, बेला शेंडे, आनंदी जोशी व विशाल यांनी गायली आहेत. त्यामुळे आता प्रेक्षक चित्रपटासोबत गाण्यांची देखील वाट बघत आहेत.

हेही वाचा :

‘संघर्षाचा तुम्ही दररोज सामना करत आहात’, म्हणत क्रांती रेडकरने दिल्या पती समीर वानखेडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

‘एक वर्ष रेसलिंग करा आणि मग इकडे या’, टास्कवरून चिडलेल्या मीराने दिले विकासला उत्तर

‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील आणखी एका अभिनेत्रीने घेतला मालिकेचा निरोप, कारण अजूनही गुलदस्त्यात

 


Latest Post

error: Content is protected !!