मादक अवतार आणि भन्नाट डान्स स्टाइलसाठी ओळखली जाणारी नोरा फतेही केवळ एक अभिनेत्रीच नाही तर फॅशनिस्ता देखील आहे. नोराचा फॅशन सेन्स दिवसेंदिवस अधिकच सुंदर होत जात आहे. एखादे अवॉर्ड फंक्शन असो किंवा रिअॅलिटी शो नोराची ड्रेसिंग स्टाइल नेहमीच हटके आणि आकर्षक असते.
नोराने नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. नोराचा हा फोटो तिच्या लूक्स पेक्षा जास्त दुसऱ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. बॉलिवूड अभिनेत्री नोरा सध्या दुबईत आहे. नोरा तिच्या इंस्टाग्रामवर चाहत्यांसाठी नेहमीच फोटो शेअर करत असते. नोरा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तिने प्रीटेन्ड ड्रेस घातलेला एक फोटो नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. अतिशय सुंदर दिसणाऱ्या नोराचा हा फोटो तिच्या दिसण्यासोबतच तिने घातलेल्या हिल्समुळे जास्त चर्चेत आला आहे.
या फोटोमध्ये नोराने घातलेल्या स्टायलिश हिल्सची किंमत ऐकून नक्कीच तुमचे डोळे मोठे होतील. तिच्या या स्टायलिश हिल्सची किंमत आहे ५४,५०६ रुपये. हो, तब्बल ५४ हजार रुपयांचे हिल्स तिने घातले आहेत. या फोटोमध्ये नोरा कमी मेकअपमध्ये देखील सुंदर दिसत आहे. तिने सोन्याची चेन आणि पेंडंट तिने गळ्यात घातले आहे.
नोराने आतापर्यंत तिच्या अप्रतिम डान्सने सर्वाना वेड लावले आहे. तिने दिलबर, ओ साकी-साकी, कमरिया यासारख्या हिट गाण्यांमध्ये डान्स केला आहे. नोरा आता अभिषेक दूधियाच्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात नोरा अजय देवगन, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, शरद केळकर सारख्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.
चंदेरी दुनियेतील कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर नोरा फतेहीने फिल्मी करिअरची सुरूवात ‘रोअर: टाइगर्स ऑफ द सुंदरबन’ मधून केली होती. अलीकडेच नोरा ‘नाच मेरी राणी’ या पंजाबी गाण्यात बेली डान्स करताना दिसली.









