अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या मुलीसोबत खूप वेळ घालवत आहे. यावेळी तिचे संपूर्ण लक्ष तीच्या कुटुंबावर आणि मुलीवर असते. तिच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर ती ‘सिंघम अगेन’मध्ये दिसणार आहे, ज्याचा ट्रेलर काल सोमवारी प्रदर्शित झाला. दीपिका या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची अटकळ बांधली जात होती, मात्र तसे झाले नाही. याचे कारण म्हणजे तिचे या दिवसात सुरू असलेले व्यस्त वेळापत्रक. अर्थात, दीपिका ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये आली नाही, परंतु तिच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमधून तिने एका अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी नक्कीच थोडा वेळ काढला आहे.
आई झाल्यानंतर दीपिकाला कोणत्याही कार्यक्रमात पाहण्याची आणि ऐकण्याची उत्सुकता असलेल्या प्रेक्षकांना ती मानसिक आरोग्याविषयी बोलताना ऐकायला मिळणार आहे. दीपिका स्वतः डिप्रेशनच्या काळातून गेली आहे हे कोणापासून लपून राहिलेले नाही. यासाठी तिने योग्य उपचार घेतले. मानसिक आरोग्याचे गांभीर्य पाहून तिने ‘Live, Love Laugh Foundation’ची स्थापना केली. आता या फाउंडेशनच्या अंतर्गत ती ‘जागतिक मानसिक आरोग्य दिना’च्या निमित्ताने या विषयावर चर्चा करणार आहे.
दीपिका पदुकोण प्रसिद्ध लेखिका एरियाना हफिंग्टन यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहे. दीपिका पदुकोणच्या फाउंडेशनच्या इन्स्टा पेजवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यासोबत लिहिले आहे की, ‘लाइव्ह लव्ह लाफ फाऊंडेशन हे घोषित करताना उत्सुक आहे की 2024 च्या लेक्चर सिरीजमध्ये संस्थापक दीपिका पदुकोण आणि विशेष पाहुणे एरियाना हफिंग्टन मानसिक आरोग्यावर चर्चा करतील.’ दीपिका आणि एरियाना कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य या विषयावर चर्चा करतील आणि त्यांचा प्रवास देखील सांगतील. ही चर्चा 8 ऑक्टोबर रोजी यूट्यूब चॅनलवर शेअर केली जाईल.
जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. याच निमित्ताने दीपिका या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे. दीपिका पदुकोणने 8 सप्टेंबर 2024 रोजी एका मुलीला जन्म दिला. ‘सिंघम अगेन’ चित्रपटातील अभिनेत्रीला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेत्री दमदार स्टाईलमध्ये दाखवण्यात आली आहे. ती ‘लेडी सिंघम’च्या भूमिकेत तिचा ॲक्शन पराक्रम दाखवताना दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
दीपिकाच्या आवाजाने प्रभावित होऊन, संजय लीला भन्साळी यांनी अभिनेत्रीला दिली होती ‘लीला’ची भूमिका