सैराट फेम आर्चीनं ‘बंजारा’ आऊटफिटमधील फोटो शेअर करत लावलं चाहत्यांना याड! तुम्हीही घ्या पाहून


आपल्या सैराट चित्रपटातून घराघरांमध्ये पोहोचलेली अभिनेत्री प्रेरणा राजगुरू म्हणजेच रिंकू राजगुरू. ती आपल्या रिंकू या टोपननावाने ओळखली जाते. अल्पावधीतच तिने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने आपलेसे केले आहे. सैराटच्या यशानंतर रसिकांच्या मनात छाप सोडायला तिने कोणतीच कसर सोडली नाही आहे. ‘मराठीत सांगितलेलं कळत नाही का इंग्लिशमध्ये सांगू’ या तिच्या डायलॉगने अक्षरश: सर्वांनाच वेड लावले होते. त्यानंतर तिच्या फॅन फॉलोविंगमध्ये कमालीची वाढ झाली आहे.

रिंकू जितकी चित्रपटात बिनधास्त दिसते तितकीच व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा आहे. अभिनयाप्रमाणेच तिला नृत्याची आणि चित्रकलेची खूप आवड आहे. आपल्या सोशल मीडियावर ती नवनवीन फोटो अपलोड करत असते. सध्या ती स्वतःला खूपच फिट ठेवत आहे. हे तिने पोस्ट केलेल्या प्रत्येक फोटोमधून दिसते. सैराटपासून ते हंड्रेड चित्रपटापर्यंत तिच्या लूकमध्ये बदल घडून आला आहे.

नुकताच तिने बंजारा लूकमध्ये एक फोटोशूट केले आहे. या फोटोवर तिच्या चाहत्यांनी बऱ्याच कमेंट केल्या आहेत. तिचा हा लूक तिने परिधान केलेल्या कपड्यांवर खूपच उठून दिसतोय. त्यात ती खूपच सुंदर दिसतेय. मरून रंगांच्या या ड्रेस आणि कानात घातलेले डुल आणि बिंदी यामुळे ती खूपच आकर्षक दिसत आहे. हा ड्रेस संजीव राठोड यांनी डिझाइन केला आहे. ज्यात ती आपल्या कॅप्शनमध्ये त्यांचे आभार मानताना दिसली. सोबतच तिच्या या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तुम्ही सदैव तुमच्या पद्धतीने हवे तसे सुंदर दिसत रहा.”

पारंपरिक अशा पोशाखातला हा लूक सर्वांनाच खूप भावला आहे. तिच्या या लूकने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. या फोटोवर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया आणि लाईक्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मूळची अकलूजची असलेली ही अभिनेत्री फार कमी कालावधीत लोकप्रिय झाली. सैराटनंतर तिने हिंदी आणि कन्नड भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘कागर’, ‘मेकअप’ आणि ‘मनसु मलिंगे’ हे तिचे चित्रपट प्रदर्शित झाले होते.

रिंकूने ‘हंड्रेड’ या वेबसीरिज मार्फत डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला होता. या वेबसीरिजमध्ये तिच्या सोबत अभिनेत्री लारा दत्ता पोलिसाच्या भूमिकेत होती. तिच्या अनपॉज्ड या वेबसीरिजमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली आहे. अमिताभ बच्चन यांच्या आगामी ‘झुंड’ या चित्रपटात ती दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला होता, त्यामुळे तिचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षकांना आतुरता आहे.

लॉकडाऊनमध्ये ती लंडनमध्ये अडकली होती. त्यावेळी ती आपल्या आगामी ‘छुमंतर’ या चित्रपटाचे शूटिंग करत होती. दरम्यान त्या चित्रपटाचे शूटिंग संपुष्टात आले होते. या सिनेमात तिच्यासोबत सुव्रत जोशी आणि प्रार्थना बेहरे अभिनय करताना दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-मराठमोळ्या तेजस्विनीचा बोल्ड लूक पाहून ‘या’ अभिनेत्याचा ‘कलेजा खल्लास…’, एकदा पाहाच

-शर्टलेस सलमान खानसोबतचा फोटो शेअर करून अर्पिता खानने दिला जुन्या आठवणींना उजाळा

-परी म्हणू की सुंदरा..! पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मराठमोळी अभिनेत्री दिसतेय जणू स्वर्गातील अप्सरा


Leave A Reply

Your email address will not be published.