Monday, January 30, 2023

‘सिनेमा रिलीज झाला, तर भारत-पाकिस्तानचं नातं सुधारेल’, पाकिस्तानी अभिनेत्याचं मोठं वक्तव्य

पाकिस्तानी लोकप्रिय अभिनेता फवाद खान आणि प्रसिद्ध अभिनेत्री माहिरा खान यांचा नवीन चित्रपट मौला जट हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला असून बॉक्सऑफिसवर चांगलीच धमाल करत आहे. शुक्रवार (दि, 30 डिसेंबर) रोजी हा चित्रपट भारतामध्येही प्रदर्शित होणार होता मात्र, भारतामध्ये चित्रपट प्रदर्शनावर अनेक राजकारणी नेत्यांनी विरोध केला आणि प्रदर्शनाला पुढे ढकलले आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री माहिरा खान हिने देखिल याबद्दल संतापव्यक्त केला होता. आता अभिनेता फवाद खान याने आपले मौन तोडले आहे. त्याने पहिल्यांदाच आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

पाकिस्तानी चित्रपट ‘मौला जट’ ( The Legend of Maula Jatt) मध्ये लोकप्रिय अभिनेता फवाद खान (Fawad Khan) आणि प्रसिद्ध अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) हे दोन कालाकार या चित्रपटामध्ये मुख्य भुमिकेत आहेत. या चित्रपटाने जगभरात धुमाकुळ घातला आहे. मात्र, भारतामध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला आहे. त्यामुळे अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच संताप व्यक्त केला होता आता मात्र, अभिनेता फवादनेही आपले मौन तोडले आहे.

फवादने आपल्या अधिकृत इस्टग्राम अकाउंटवर एक मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो हॉंगकॉंगमधील माध्यमांशी संवाद साधताना दिसून येत आहे. त्यावेळी अभिनेत्याला चित्रपट प्रदर्शनावर प्रश्न विचारला होता तेव्हा अभिनेता म्हणतो की, “कधी ऐकायला की चित्रपट प्रर्शित झाला आहे, तर कधी ऐकायला मिळतंय की, चित्रपट रद्द केला आहे. जर भारतामध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला तर भारत आणि पाकिस्तानमध्ये चागलं नातं निर्माण होऊ शकेल अशी मी आशा करत आहे.”

 

View this post on Instagram

द लिजेंड ऑफ मौला जट या चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर, यामध्ये फावाद खान आणि माहिरा खान .यांच्या अभिनयाचे अनेकजन कौतुक करत आहेत. चित्रपटाची कथा 1979 मधील क्लासिक टायटल मौला एक मॉडर्न एडेप्शन आहे. मौला जट हा चित्रपट 13 ऑक्टोंबर रोजी पाकिस्तानशिवाय देशभरात प्रदर्शित झाला असून बॉक्सऑफिसवर तब्बल 200 कोटींचा गल्ला जमवला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रिषभच्या ‘कांतारा’चा नादच खुळा! बक्कळ कमाईनंतर आता ‘हे’ गाणेही ठरले सुपरहिट; युट्यूबवर 5 कोटी हिट्स
वरुणने वाघासोबत, तर अनुष्काने कुटुंबासोबत म्हटले 2022ला बायबाय, पाहा कलाकारांच्या हटके पोस्ट

 

हे देखील वाचा