Thursday, March 28, 2024

वडिलांच्या पुण्यतिथीला भावुक झाला संजय दत्त; म्हणाला, ‘तुम्ही माझी ताकद आहात आणि…’

साठच्या दशकातील ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त (Sunil Dutt) यांनी एकापेक्षा एक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आणि आपल्या अभिनयाने चाहत्यांचा एक मोठा गट तयार केला होता. सुनील दत्त आज या जगात नाहीत, पण त्यांचा दमदार अभिनय आजही चाहत्यांच्या मनात ताजा आहे. २५ मे २००५ रोजी सुनील दत्त यांनी या जगाचा निरोप घेतला. दरम्यान वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त संजय दत्तने (Sanjay Dutt) एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 

संजय दत्तच्या यशात सुनील दत्तचा आहे मोलाचा वाटा
बॉलिवूडचा मुन्ना भाई संजय दत्तच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त संजू बाबाच्या वैयक्तिक आयुष्याचीही खूप चर्चा झाली होती. त्याचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. म्हणूनच त्याच्या आयुष्यावर चित्रपट ‘संजू’ बनला. प्रेक्षकांनाही हा चित्रपट खूप आवडला. संजय दत्त आज इंडस्ट्रीत ज्या स्थानावर आहे, त्यामध्ये त्याचे वडील सुनील दत्त आणि आई नर्गिस (Nurgis) यांचे मोठे योगदान आहे. आजही आई आणि वडील दोघांची आठवण करून संजय दत्त खूप भावूक होतो. (sanjay dutt shares this emotional post in remembers to his father sunil dutt death anniversary)

संजय दत्तने वडिलांसाठी लिहिली एक भावनिक पोस्ट
संजय दत्तने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर वडील सुनील दत्त यांच्यासोबतचा एक अनसीन फोटो शेअर केला आहे. या फोटोत संजय दत्त खूपच तरुण दिसत आहे. त्याचवेळी सुनील दत्तही एकदम फिट आणि देखणे दिसत आहेत. फोटोसोबत संजय दत्तने लिहिले की, “माझ्या मार्गदर्शनासाठी आणि संरक्षणासाठी तुम्ही नेहमीच माझ्यासोबत होते. तुम्हीच माझी शक्ती, प्रेरणा आणि प्रत्येक गरजेचा आधार होते… तुम्ही नेहमीच माझ्या हृदयात राहाल पप्पा, मला तुमची आठवण येते.”

सुनील दत्त यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. ते शेवटचे मुलगा संजय दत्तसोबत ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ चित्रपटात दिसले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा