आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात राजकुमार रावसोबत उभी राहिलेली ‘पत्रलेखा’, ‘या’ चित्रपटातून बॉयफ्रेंडसोबत केली होती बॉलिवूडमध्ये एंट्री


चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा अनेकांची असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण जीवाचे रान देखील करतात. शेवटी ते आपले स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वीही होतात. या कलारांच्या यादीत अभिनेत्री ‘पत्रलेखा’च नाव घेण्यास कोणीच विसरणार नाही. तिने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. चला तर मग जाणून घेऊया तिच्या या बॉलिवूड प्रवासाबद्दल…

अभिनेत्री पत्रलेखाचा जन्म 20 फेब्रुवारी 1990 मध्ये झाला. तिने सन 2014 साली ‘हंसल मेहता’ यांच्या ‘सिटी लाइट’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा पत्रलेखाला आधीपासूनच होती. तिची हीच इच्छा तिला मुंबईपर्यंत घेऊन गेली. त्यानंतर तिला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पत्रलेखा ही एका अभिनेत्री सोबतच एक उत्तम क्लासिकल ट्रेंड डान्सर देखील आहे. तिने लहान असताना भरतनाट्यमचे क्लासदेखील केले होते.

पत्रलेखा ही अत्यंत हुशार आणि महत्वकांक्षी अभिनेत्री आहे. अभिनय आणि डान्सिंग व्यतिरिक्त तिने खेळातही प्राविण्य प्राप्त केले आहे. स्विमिंग, घोडस्वारी, बास्केटबॉल हे‌ तिच्या व्यक्तिमत्त्वात कधीही न उलगडलेले पैलू आहेत. पत्रलेखा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याच्या आधीचपासूनच ती बॉलिवूडची खूप दिवाणी होती. तिला रिजनलपासून ते वर्ल्ड सिनेमे बघायाला खूप आवडायचे.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्रलेखा ही अभिनेता ‘राजकुमार राव’ याची गर्लफ्रेंड होती. या दोघांनीही सोबतच ‘सिटी लाइट’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. परंतु राजकुमार राव हा या आधी देखील काही सिनेमांमध्ये छोट्या मोठ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आला होता. परंतु सिटी लाइट या चित्रपटाने त्याला ओळख दिली. या चित्रपटातील त्यांचा अभिनय प्रेक्षकांना खूपच पसंत पडला. या चित्रपटासाठी पत्रलेखाला ‘बेस्ट फीमेल डेब्यू अवॉर्ड’ दिला गेला होता.

यानंतर तिने ‘लव्ह गेम्स’, ‘नानू की जानू’ या चित्रपटात देखील काम केले होते. यासोबतच ती कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील प्रवेश करणार आहे. उत्कृष्ट अभिनय आणि दमदार बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर पत्रलेखा आत्तापर्यंत चित्रपटसृष्टीत नाव नाही मिळवू शकली. परंतु तिने यशस्वी होण्याचे आपले प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तब्बल २४ फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर ‘हा’ अभिनेता करणार होता आसाममध्ये चहाच्या मळ्यात काम, पण…

-लग्नानंतर केवळ ८ दिवसांत अभिनेत्रीला चुकिच्या व्यक्तीशी लग्न केल्याची झाली होती जाणीव, पुढे घटस्फोट घेत…

-रेखासारख्या अभिनेत्रीसमोर उत्तम अभिनय करणारी ‘सोनू वालिया’, उंचीमुळे मिळत नव्हते चित्रपटात काम


Leave A Reply

Your email address will not be published.