सोशल मीडिया म्हणजे अतिशय कमाल धमाल असलेला प्लॅटफॉर्म आहे. सर्वदूर पोहच असलेला या सोशल मीडियाने मागील काही वर्षांपासून लोकप्रियेचे शिखर गाठले आहे. कलाकार देखील या सोशल मीडियाचा वापर त्यांच्या कलाकृती रसिकांपर्यंत पोचवण्यासाठी करताना आपल्याला नेहमीच दिसतात. भोजपुरी भाषेतील सर्वच गाणी यूट्यूबवरच प्रदर्शित केली जातात. सध्या मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवणारी ही गाणी चांगलीच चर्चेत आली आहे.
भोजपुरीमधील पावरफुल अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवनसिंगची गाणी सर्वांनाच आवडतात. त्याची गाणी पाहण्यासाठी फॅन्स नेहमीच उत्साही असतात. त्याच्या गाण्यांना नेहमीच मिलियनच्यावर व्ह्यूज आणि लाइक्स मिळत असतात. अशाच या पवनसिंगच्या एका गाण्याने एक मोठे आणि गौरवशाली रेकॉर्ड केले आहे. पवनसिंगच्या ‘पुदीना ऐ हसीना’ या प्रसिद्ध गाण्याने तब्बल १०० मिलियनचा व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. या गाण्याला आतापर्यंत १० कोटींपेक्षा अधिक लोकांनी पाहिले असून, या गाण्याचे आतापर्यंत ५ लाख रिल्स बनले आहे. ही अशी संख्या आहे, जी अजूनपर्यंत भोजपुरीमधल्या कोणत्याही गायकाला मिळवता आली नाहीये.
या गाण्याबद्दल अजून एक खास गोष्ट म्हणजे, या गाण्याने मागच्या आठवड्यात अजून एक रेकॉर्ड तयार केले आहे. मागच्या आठवड्यात यूट्यूबवर सर्वात जास्त ऐकलेले गाणे म्हणून ‘पुदीना ऐ हसीना’ या गाण्याचे नाव समोर आले आहे. हे गाणे सध्या प्रेक्षकांना तुफान आवडत आहे. या गाण्यांनी लोकांना वेड लावले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
पवनसिंगच्या ‘पुदीना ऐ हसीना’ गाण्याला प्रसिद्ध संगीत कंपनी वेबने त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरून प्रसिद्ध केले आहे. तेव्हा या कंपनीने विचार देखील केला नसेल, की हे गाणे एवढे अमाप हिट होईल. ‘पुदीना ऐ हसीना’ हे एक रोमँटिक गाणे असून, यात अभिनेत्याने प्रियकरामध्ये असलेला उतावीळपणा गाण्यातून सर्वांसमोर आणला आहे.
या गाण्याला प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिका अनुपमा यादवने तिचा आवाज दिला आहे. या गाण्याचे लेखन कुमार पांडे आणि अर्जुन अकेला यांनी केले असून संगीत प्रियांशु सिंग यांनी दिले आहे. व्हिडिओ एडिटिंगचे काम रवी पंडित आणि पी आर ओ रंजन सिन्हा यांचे आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…










