अभिनेत्री पायल रोहतगीला अटक; सोसायटी चेअरमनला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप


बॉलिवूड आणि टेलिव्हिजन अभिनेत्री पायल रोहतगी आणि विवाद यांचे खूप जुने नाते आहे. ती अनेकदा वेगवेगळ्या विषयांवरून चर्चेत आली आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. यावर शेअर केलेल्या तिच्या व्हिडिओमुळे ती खूप चर्चेत असते. ती या व्हिडिओद्वारे अनेक गोष्टींविषयी बोलत असते. सध्या ती अडचणीत सापडली आहे. तिने सोशल मीडियावर तिच्या सोसायटीच्या चेअरमनला धमकी आणि शिव्या दिल्याच्या आरोपाखाली तिला पोलिसांनी अटक केली आहे. परंतु तिने नंतर सोशल मीडियावरून ही पोस्ट डिलीट केली आहे. यामुळे अनेक वाद झाले. (Payal Rohatgi has been arrested for abuse at her society chairman)

माध्यमातील वृत्तानुसार, 20 जून रोजी सोसायटी एजीएम मीटिंगमध्ये पायल गेली होती. ती सोसायटीची सदस्य देखील नाहीये. अशात पायलला येण्यास नकार दिला, तर तिने थेट शिव्या देण्यास सुरुवात केली. या सोबतच पायलने सोशल मीडियावर चेअरमनला जीवे मारण्याची धमकी दिली, असा गुन्हा दाखल केला आहे. असे देखील म्हटले जाते की, पायलने सोसायटीमधील मुलांच्या खेळण्यावरून देखील अनेक वेळा भांडणं केले आहे. या सगळ्या प्रकरणाबाबत पायलला अहमदाबाद सॅटेलाईट पोलिसांनी अटक केली आहे.

याआधीही पायलला अटक करण्यात आली होती. 21 सप्टेंबर, 2019 रोजी पायलने एका व्हिडिओच्या माध्यमातून मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर तिला राजस्थानमधील पोलिसांनी अटक केले होते. त्यानंतर तिला राजस्थान न्यायालयातून जामीन देखील मिळाला होता.

पायलने चित्रपटसृष्टीत देखील काही खास काम केले नाही. बॉलिवूडमध्ये कोणत्याच पात्राने तिने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले नाही. पायलने ‘रिफ्युजी’, ‘तुम से मिलकर’, ‘रक्त’, ‘तौबा तौबा’, ’36 चायना टाऊन’, ‘ढोल’, अगली और पगली’, ‘दिल कबड्डी’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फ्लॉप ऍक्टर ठरूनही रॉयल जीवन जगतोय अभिनेता आफताब; तर वयाच्या ३८व्या वर्षी दुसऱ्यांदा अडकला लग्नगाठीत

-केरळ हायकोर्टाकडून चित्रपट निर्माती आयशा सुल्तानाला अटकपूर्व जामीन मंजूर; भाजप नेत्याविरुद्ध केले होते वक्तव्य

-कपूर घराण्याचे नियम तोडत करिश्माने केले होते अभिनयात पदार्पण; वाचा अभिनेत्रीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी


Leave A Reply

Your email address will not be published.