Friday, March 29, 2024

‘या’ इंडो- नेपाळी सिनेमाची भारतीय चित्रपटगृहात चांदी; 75 रुपयांच्या तिकिटांमुळे केली बक्कळ कमाई

भारतामध्ये अनेक प्रकारचे चित्रपट प्रदर्शित होत असतात. प्रेक्षकही त्यांचे चित्रपट आवर्जून पाहत असतात, त्यामुळे यांचे चित्रपट भारतातही चांगलीच कमाई करतात. भारतामध्ये ‘राष्ट्रीय चित्रपट सोहळा‘ आयोजित केला होता आणि त्याच दिवशी अनेक चित्रपटही प्रदर्शित झाले होते. त्यामुळे लोकांनी या संधीचा चांगलाच फायदा घेतला आणि एका इंडो-नेपाळी चित्रपटालाही पुरेपूर फायदा झाला.

नुकताच प्रदर्शित झालेला ‘प्रेम गीत 3’ (Indo Nepali Movie Prem Geet 3) या इंडो-नेपाळी चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगलीच धमाल केली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. आता या चित्रपटाचा नुकताच तिसरा भाग प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.

हा एक इंडो- नेपाळी (Indo Nepali) चित्रपट असून त्याची स्टोरी प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. या चित्रपटाचा तिसरा भाग ‘प्रेम गीत 3‘ (Prem Geet 3) शुक्रवारी (दि. 23 सप्टेंबर) दिवशी 500 स्क्रीनवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी धमाल केली असून 92 लाखांची कमाई केली आहे. ही इंडो- नेपाळी यांच्यासाठी ही खास ओपनिंग आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

तसं तर या चित्रपटाचे बजेट एकूण 11 कोटी एवढे आहे. मात्र, हा चित्रपट ‘राष्ट्रीय चित्रपट सोहळा’च्या दिवशी प्रदर्शित झाला. या दिवशी कोणत्याही चित्रपटाचे तिकीट फक्त 75 रुपये होते, त्यामुळे या चित्रपटाची चांगली ओपनिंग झाली आहे. तिकीट कमी असल्यामुळे या चित्रपटाची ग्रॅंड ओपनिंग झाल्याचे दिसून येत आहे. आता सगळ्यांचे लक्ष फक्त एकाच गोष्टीवर आहे, ते म्हणजे हा चित्रपट बॉक्स आफिसवर किती धमाल करू शकेल.

हेही वाचा- टेलिव्हिजन दुनियेत अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या अर्चनाने पळून केले होते लग्न, ब्राह्मणाला रात्री 11 वाजता…

‘प्रेम गीत 3’ या चित्रपटामध्ये ‘इंडियन आयडल’चा विजेता पवनदीप राजन (Pawandeep Rajan) याने आपले गाणे कंपोज करुन या चित्रपटामध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटामध्ये ‘कोई न कोई नाता हैं’ गाणे कंपोज केले असून याला जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) या गायकाने आपला आवाज दिला आहे. हे गाणे 23 ऑगस्टला युट्यूबवर प्रदर्शित झाले असून याला 73 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ओळख लपवण्यासाठी जॅकलिनने घातले ‘तसले’ कपडे, वकिलांच्या घेऱ्यात कोर्टातून बाहेर पडली अभिनेत्री
नेहा अन् फाल्गुनीच्या वादात तिसऱ्याच अभिनेत्रीची एन्ट्री; टोला लगावत नाही तसलं बोलली, तुम्हीही वाचाच

हे देखील वाचा