Saturday, April 19, 2025
Home मराठी ‘जुगनू’ गाण्यावर कामत जोडप्याने धरला ठेका; चाहते तर सोडाच, कलाकारही करतायेत कमेंट्सचा वर्षाव

‘जुगनू’ गाण्यावर कामत जोडप्याने धरला ठेका; चाहते तर सोडाच, कलाकारही करतायेत कमेंट्सचा वर्षाव

मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात रोमँटिक आणि मजेशीर जोडी म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत होय. ते त्यांचे रोमँटिक फोटो तसेच मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या चाहत्यांना देखील त्यांचे हे व्हिडिओ खूप आवडत असतात. अशातच या क्यूट जोडप्याचा एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते दोघे अत्यंत सुंदर डान्स करताना दिसत आहेत.

प्रियाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, उमेश आणि प्रियाने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स घातली आहे. ते दोघेही ‘जुगनू’ या गाण्यावर डान्स करत आहेत. ते छतावर उभे राहून हा डान्स करताना दिसत आहेत. (Priya bapat and share their dance video on social media)

हा व्हिडिओ शेअर करून प्रियाने लिहिले आहे की, “माझ्या क्रेझी पार्टनरसोबत पहिले डान्सिंग रील.” त्यांचा हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याच्या या पोस्टवर अभिनेता आशुतोष गोखलेने कमेंट केली आहे की, “अरे अरे ऐकत नाही.” तसेच ऋतुजा बागवे हिने “लव्ह लव्ह लव्ह” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

प्रियाने ‘वजनदार’, ‘टाइमपास २’, ‘लोकमान्य: एक युगपुरूष’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘टाइम प्लीज’, ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ यांसारख्या चित्रपटात अभिनय करून, लाखो चाहत्यांच्या मनात घर केले आहे. याशिवाय प्रिया संजय दत्त अभिनित ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या हिंदी चित्रपटातही दिसली आहे. तसेच उमेशने देखील अनेक चित्रपटात काम केले आहे. तो सध्या ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत मुक्ता बर्वेसोबत काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू मला परवानगी दिली म्हणून…’, सुंदर कॅप्शनसह स्मिता तांबेने केला तिच्या मुलीसोबतचा फोटो शेअर

-अरे व्वा! मेघराज राजेभोसले यांची फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

-अभिनेत्री ऋतुजा बागवेची सुंदरता अशी की, पाहून चाहताही म्हणाला, ‘दीपिका पदुकोणचे मराठी व्हर्जन’

हे देखील वाचा