‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने केला ग्लॅमरस फोटो शेअर; स्वत:लाच म्हटले ‘हॉट गर्ल’


सोशल मीडिया आल्यापासून कलाकार आपल्या फॅन्ससोबत चोवीस तास जोडलेले असतात. आपली वैयक्तिक, व्यायसायिक माहिती फॅन्सपर्यंत पोहोचवण्यासाठी कलाकार सोशल मीडियाचा वापर करतात. सोबतच फॅन्सच्या प्रश्नांना उत्तर देणे, आपले वेगवेगळे फोटो, व्हिडिओ शेअर करायला देखील सोशल मीडिया चांगला पर्याय झाला आहे. सतत चर्चेत राहण्यासाठी देखील सेलिब्रिटी सोशल मीडियाचाच आधार घेतात. जवळपास सर्वच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय आहेत. याच सोशल मीडियाच्या प्लँटफॉर्मवर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा.

बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी प्रियांका चोप्रा जोनास नेहमी सोशल मीडियावर तिचे विविध फोटो, व्हिडिओ आणि अपडेट पोस्ट करत असते. नुकताच प्रियांकाने तिचा एक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. लंडनमध्ये असलेल्या प्रियांकाने तिचा एक सेल्फी नुकताच इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे.

पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि शॉर्ट डेनिममध्ये हॉट दिसणाऱ्या प्रियांकाने तिचा समर लूक शेअर केला असून, तिने आरश्यासमोर उभे राहत फोटो काढला आहे. तिच्या फोटोच्या मागे तिचे कपाट दिसत आहे, तर बॅकग्राऊंडला मेगन थे स्टॅलियनचे ‘हॉट गर्ल समर’ गाणे वाजत आहे. यासोबतच प्रियांकाने तिच्या फोटोला सूर्याचे स्टिकर लावत स्टोरी पूर्ण केली आहे. कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने स्वत:ला ‘हॉट गर्ल’ म्हटले आहे.

मागच्या अनेक दिवसांपासून प्रियांका चोप्रा ऍमेझॉन वेबसीरिज ‘सिटाडेल’ च्या शूटिंगसाठी लंडनमध्ये आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रियांकाच्या पतीला निक जोनासला शूटिंग दरम्यान दुखापत झाली, तेव्हा देखील प्रियांका लंडनमध्येच होती. काही दिवसांपूर्वी प्रियांका निक जॉनाससोबत लॉस एंजेलिसमध्ये पार पडलेल्या बिलबोर्ड म्युझिक अवार्ड्स २०२१ मध्ये दिसली होती. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान प्रियांकाचा हॉट अवतार सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता.

प्रियांका सध्या हिंदी सिनेमांमध्ये कमी दिसत आहे. तिचा राजकुमार रावसोबतचा ‘द व्हाईट टायगर’ हा प्रदर्शित झालेला शेवटचा हिंदी सिनेमा होता. प्रियांका लवकरच हिंदी चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तिच्या फॅन्सला देखील तिला बॉलिवूड सिनेमात पाहायची इच्छा आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आनंदाची बातमी! ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच करणार पुनरागमन; कृष्णा अन् भारतीने दिली हिंट

-‘द फॅमिली मॅन’च्या ‘सुची’नं केलंय शाहरुख खानसोबत काम; आजही सांभाळून ठेवलीय अभिनेत्याने दिलेली ‘ही’ गोष्ट

-‘शालू’च्या डान्सने पुन्हा चोरली लाखो मने; बघता बघताच पडला लाईक अन् कमेंट्सचा पाऊस


Leave A Reply

Your email address will not be published.