शिल्पा नाही, तर ‘या’ अभिनेत्रीसोबत पडद्यावर करायचाय राज कुंद्राला रोमान्स; पत्नीनेच खोलली होती पोल


बॉलिवूड कलाकारांसोबत कधी काय घडेल, काही सांगता येत नाही. कधी त्यांची, प्रेमप्रकरणं समोर येतात, कधी त्यांचा घटस्फोट, कधी लग्न होतं, तर कधी त्यांना अटक झाल्याचे समजते. अशी नानाविध गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत असतात. असेच काहीसे सध्या बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रासोबत घडत आहे. व्यावसायिक राज कुंद्राचे नाव अश्लील चित्रपटांसोबत जोडले आहे. मंगळवारी (२० जुलै) त्याला न्यायालयात दाखल केले, त्यानंतर त्याला २३ जुलैपर्यंत न्यायायलीन कोठडी सुनावण्यात आली. सध्या त्याला मुंबईच्या भायखळा तुरुंगात शिफ्ट करण्यात आले आहे. असे म्हटले जात आहे की, राज ९ कंपन्यांचा अध्यक्ष आहे. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला तिच्यासोबत ऑनस्क्रीन रोमान्स करायचा नाहीये. त्याला इतर अभिनेत्रीसोबत रोमान्स करायचा आहे.

काही काळापूर्वी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पत्नी शिल्पा शेट्ट आणि मेहुणी शमिता शेट्टीसोबत आलेल्या राज कुंद्राने याबद्दल चर्चा केली. कपिलने विचारले की, ‘जर त्याला चित्रपटात रोमान्स करण्याची संधी मिळाली, तर तो कोणत्या अभिनेत्रीसोबत पडद्यावर रोमँटिक होणे पसंत करेल?’ यावेळी राजच्या आधीच शिल्पाने उत्तर देत त्याची पोल खोलली होती. तिने सांगितले होते की, “दीपिका पदुकोण.” म्हणजेच शिल्पालाही माहिती आहे की, राजला दीपिका पदुकोण आवडते. (Raj Kundra Wants To Romance On Screen With This Actress Not Shilpa Shetty)

जेव्हापासून राज कुंद्राचे नाव अश्लील चित्रपटांच्या व्यवसायाशी जोडले आहे, तेव्हापासूून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे. नेटकरीही राजसोबत शिल्पाला ट्रोल करत आहेत.

हे आहे संपूर्ण प्रकरण
या वर्षाच्या सुरुवातीला मुंबई जवळील एका बंगल्यामध्ये अश्लील चित्रपटांची शूटिंग सुरू असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात याचा तपास सुरू झाला. तरीही हा तपास मध्यंतरी काहीसा शांत होता. मात्र, मागील काही आठवड्यांपासून या तपासाने पुन्हा एकदा जोर धरला आहे.

राज कुंद्राच्या बंगल्यात व्हायची शूटिंग
खरं तर ४ फेब्रुवारी रोजी पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली होती, ज्याचा पाठलाग करत पोलिसांनी उत्तर मुंबईतील प्रसिद्ध बीच मड आयलँड येथील एका बंगल्यावर छापेमारी केली होती. इथे ५ लोक पॉर्न चित्रपटाची शूटिंग करत होते. पाच जणांनाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात राज कुंद्राचेही नाव समोर आले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रिया वारियरचा देशात नाही तर परदेशात डंका! साडी नेसून रशियाच्या रस्त्यांवर केला भन्नाट डान्स

-‘सैंया झूठों का बड़ा सरताज निकला’ गाण्यावर थिरकली ऋचा चड्ढा; पब्लिक डिमांडवर शेअर केला व्हिडिओ

-पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच आकर्षक, पाहून चुकेल तुमच्याही हृदयाच्या ठोका


Leave A Reply

Your email address will not be published.