नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ या चित्रपटातून नावारूपाला आलेली मराठी म्हणजे राजेश्वरी खरात. तिचे या चित्रपटातील शालू हे पात्र चांगलेच गाजले होते. आपल्या साध्या भोळ्या अंदाजाने सर्वांना तिच्या प्रेमात पडणारी शालू तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आहे. सध्या ती तिच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरील पोस्टमुळे फार चर्चेत आहे. तिचे फॅन फॉलोविंग देखील खूप आहे. त्यामुळे तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाहीत. अशातच तिचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामुळे ती चर्चेत आहे. (Rajeshwari kharat new video viral on social media)
राजेश्वरीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती काही डायलॉगवर हावभाव करताना दिसत आहे. तिने गुलाबी आणि काळ्या रंगाचा स्लीव्हलेस टॉप घातला आहे. यामध्ये ती म्हणते की, “उद्धट असल्याचा हा फायदा आहे की, फालतू लोकं परत आपल्या तोंडी लागत नाहीत.”
तिचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. तिचे चाहते नेहमी प्रमाणेच या व्हिडिओला देखील जोरदार प्रतिसाद देताना दिसत आहेत.
राजेश्वरीला तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. काहींना तिचा अंदाज आवडतो, तर काहींना आवडत नाही. परंतु चुकीच्या कमेंट्सना राजेश्वरीने सडेतोड उत्तर देखील दिले आहे.
राजेश्वरीचे फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. तिच्या सोशल मीडियावरील वावरामुळे ती खूप लोकप्रिय झाली आहे. राजेश्वरीने नागनाथ मंजुळे यांच्या २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फँड्री’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली. या एकाच चित्रपटाने तिला भरभरून ओळख दिली. त्यानंतर तिने सन २०१७ मध्ये ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाची ऑनस्क्रीन सासूसोबत आहे खास मैत्री; भावना व्यक्त करत म्हणाली…