Sunday, March 16, 2025
Home बॉलीवूड कुली नंतर सुपरस्टार रजनीकांत करणार पुढील चित्रपटाची घोषणा “थलाईवर १७४” साठी ऑनबोर्ड आला हा दिग्दर्शक

कुली नंतर सुपरस्टार रजनीकांत करणार पुढील चित्रपटाची घोषणा “थलाईवर १७४” साठी ऑनबोर्ड आला हा दिग्दर्शक

सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) सध्या अनेक चित्रपटांमध्ये काम करत आहेत आणि त्यांच्याकडे आगामी प्रोजेक्ट्सची मोठी रांग आहे. सुपरस्टार त्यांच्या आगामी चित्रपटांसाठी ते तमिळ चित्रपट उद्योगातील काही सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांसह काम करत आहे. रजनीकांत यांनी नुकतेच लोकेश कनगराजच्या ‘कुली’ चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. रजनीकांत आता त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्याच्या तयारीत आहेत.

रिपोर्ट्सनुसार, रजनीकांत चित्रपट निर्माते मारी सेल्वाराज यांच्या सोबत आपल्या १७४ व्या चित्रपटासाठी हात मिळवणी करीत आहेत, ज्याचे तात्पुरते नाव ‘थलाईवर १७४’ आहे. ‘परियाराम पेरुमल’, ‘कर्णन’ आणि ‘ममनन’ अशा चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या दिग्दर्शक मारी सेल्वाराज यांच्यासोबत रजनीकांत काम करणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर आहेत.

रजनीकांतकडे सध्या लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘कुली’ आणि त्याचा १७३ वा प्रोजेक्ट ‘जेलर 2’ आहे, जो नेल्सन दिग्दर्शित ब्लॉकबस्टर ॲक्शन थ्रिलर जेलरचा सिक्वेल आहे. या चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर रजनीकांत ‘थलैवर १७४ ‘चे काम सुरू करणार आहेत. वृत्तानुसार, रजनीकांत आणि मारी सेल्वाराज कृत या शीर्षकहीन प्रकल्पाची निर्मिती ललित कुमार “7 स्क्रीन” स्टुडिओ या बॅनरखाली करणार आहे.

‘कल्की 2898 एडी’ चे म्युझिक डायरेक्टर संतोष नारायणन या बहुप्रतिक्षित प्रोजेक्टसाठी गाणी आणि ओरिजिनल स्कोअर तयार करण्याची तयारी करत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाची टीम सर्वकाही फायनल करण्यात व्यस्त आहे आणि सर्वकाही फायनल झाल्यानंतर निर्माते रजनीकांत सोबत किंवा चित्रपत अधिकृत घोषणा करतील. तसेच तांत्रिक क्रु, या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री आणि इतर कलाकारांची माहिती चित्रपटाच्या अधिकृत घोषणेनंतर प्रसिद्ध केली जाणार आहे.

टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित ‘वेट्टियान’ या आपल्या १७० व्या चित्रपटात रजनीकांत दिसणार आहेत. हा चित्रपट एक सामाजिक-ॲक्शन ड्रामा आहे आणि १० ऑक्टोबर २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. रजनीकांत ‘कुली’ नावाच्या त्यांच्या १७१व्या चित्रपटासाठी दिग्दर्शक लोकेश कन गराजसोबत काम करत आहेत. ‘कुली’चे शूटिंग पूर्ण केल्यानंतर रजनीकांत नेल्सनच्या ‘जेलर 2’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

किंग खानला पुन्हा इजा, उपचारासाठी होणार अमेरिकेला रवाना !
लीक झालेल्या त्या बाथरूम व्हिडीओबाबत उर्वशीने सोडले मौन; म्हणाली, ‘कोणत्याही स्त्रीला असा अनुभव येऊ नये’

हे देखील वाचा