लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नावर ‘ड्रामा क्वीन’ने केली सलमान खानशी तुलना; म्हणाली, ‘तुम्ही मला आणि सलमानला…’


बिग बॉस फेम अभिनेत्री राखी सावंत ही मनोरंजनाचा फुल तडका आहे. जिथे कुठे जाईल, तिथे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची एकही संधी ती सोडत नाही. म्हणूनच की काय तिला बॉलिवूडमधील ‘ड्रामा क्वीन’ असे संबोधतात. आजकाल तर ती नेहमीच रस्त्यावर, कॉफी शॉपमध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमात स्पॉट होत असते. ती दिसताच प्रेक्षक तसेच पॅपराजी आपसूकच तिच्याकडे आकर्षित होतात. ती देखील कधीच चाहत्यांना आणि पॅपराजींना नाराज करत नाही. नेहमीच त्यांच्या प्रश्नाची ती उत्तर देत असते. अशातच राखी सावंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

राखी सावंतच्या लग्नावरून नेहमीच चर्चा चालू असतात. तिला जेव्हा लग्नाबाबत विचारले जाते, तेव्हा ती प्रत्येक वेळेस नवीन नवीन खुलासे करत असते. आता जेव्हा तिला लग्नाबाबत प्रश्न विचारला, तेव्हा तिने तिची तुलना सलमान खानसोबत केली आहे. (Rakhi Sawant compare herself with salman khan on question of marriage)

व्हायरल भयानीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून राखी सावंतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राखी ‘मेरे ड्रीम मैं तेरी एन्ट्री’ या गाण्यावर जोरदार डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिने गुलाबी रंगाचा एक शॉर्ट ड्रेस घातला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हा कार्यक्रम संपल्यावर तिला पॅपराजी तिच्या लग्नाबाबत प्रश्न विचारतात. हे ऐकून ती म्हणते की, “बेबी तू मला असा प्रश्न का विचारतेस?? मी कुमारिका आहे, हे तुला आवडत नाही का?”

राखी पुढे म्हणते की, “तुम्ही सलमान खानला देखील याबाबत त्रास देता आणि मला देखील त्रास देता. लग्न करा लग्न करा. नाही करायचं आम्हाला लग्न. लग्न करून काय मिळालं. मला तरी काय मिळाले लग्न करून.”

राखी सावंतने बिग बॉसमध्ये असताना तिच्या लग्नाबाबत अनेक खुलासे केले होते. तिने सांगितले होते की, तिने लग्नाचा खुलासा केल्यामुळे तिचा पती रितेश हा खूप नाराज आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आदिल खानसोबत जोरदार ठुमके लावताना दिसली शिल्पा शेट्टी; ‘चुरा के दिल मेरा’ गाण्यावरचा धमाल परफोर्मेंस होतोय व्हायरल

-खरी-खुऱ्या आयुष्यातली ‘बार्बीडॉल’ आहे कॅटरिना कैफ; वाचा तिच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

-निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ‘डिज्नी प्रिंसेस’ दिसतेय रुबीना दिलैक; पाहा अभिनेत्रीच्या मनमोहक अदा


Leave A Reply

Your email address will not be published.