‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतने आपल्याच गाण्यावर शिकवला कृष्णा अभिषेकला डान्स; व्हिडिओ भन्नाट व्हायरल


टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टीतील सर्वात मोठी ‘ड्रामा क्वीन’ आणि चर्चेत व्यक्तीची म्हणजे वन एँड ओन्ली राखी सावंत. राखी तिच्या कामापेक्षा जास्त तिच्या विचित्र व्यक्तव्यांमुळे, वादांमुळेच जास्त लोकप्रिय झाली आहे. मीडियामध्ये चर्चेत राहण्यासाठी राखी नेहमी अनेक अतरंगी गोष्टी करतच असते. कदाचित म्हणूनच तिला ‘ड्रामा क्वीन’ म्हटले जाते. राखी सोशल मीडियावर देखील भरपूर सक्रिय आहे. ती नेहमी तिचे व्हिडिओ पोस्ट करताना दिसते. तिच्या या हटके व्हिडिओंमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करते.

आता राखीचा नवीन व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती कॉमेडियन कृष्णा अभिषेकसोबत दिसत आहे. राखीने तिचा हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला असून यात ती कृष्णा अभिषेकला डान्स शिकवताना दिसत आहे. राखी कृष्णाला ‘ड्रीम में एंट्री’ गाण्यावर हा डान्स शिकवत असून नुकतेच राखीचे हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यावर राखी डान्स करत असून कृष्णा डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडिओमध्ये हे दोघेही खूप मस्ती करताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये राखी अतिशय साध्या लूकमध्ये दिसत असून कृष्णादेखील सध्या टीशर्ट आणि जीन्समध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ खूपच कमी काळात सोशल मीडियावर व्हायरल झाला असून फॅन्स देखील या व्हिडिओवर कमेंट करत आहे. फॅन्सने राखीला म्हटले आहे की, “तुझा ड्रेस खूप क्यूट आहे, तुला असेच कपडे सूट होतात.” राखीचा हा व्हिडिओ फॅन्सला आवडत असून आतापर्यंत या व्हिडिओला २ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

राखीला काही महिन्यांपूर्वी बिग बॉसमध्ये दिसली होती. राखी बऱ्याच काळानंतर ‘ड्रीम में एंट्री’ गाण्यातून पुन्हा प्रेक्षकांसमोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच हे गाणे प्रदर्शित झाले असून, याला रसिकांनी आणि तिच्या फॅन्सने दमदार प्रतिसाद दिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नसीरुद्दीन शाह यांना ८ दिवसांनी मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, मुलाने फोटो शेअर करत दिली माहिती

-कियारासाठी वयस्कर व्यक्तीने गाडीचा दरवाजा उघडत ठोकला सलाम; नेटकरी म्हणाले, ‘तुझ्या वडिलांपेक्षा जास्त…’

-अजय देवगणच्या ओटीटी पदार्पणासोबतच कमबॅक करणार ‘ही’ अभिनेत्री; कित्येक वर्षांपासून आहे मोठ्या पडद्यापासून दूर


Leave A Reply

Your email address will not be published.