Wednesday, March 27, 2024

अमरावतीच्या आर्याची देशात चर्चा! मराठी मुलीच्या व्हायरल व्हिडिओने लावले अख्ख्या भारताला वेड

सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग म्हणून ओळखले जाते. सोशल मीडियावर दरदिवशी अनेक नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्याची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळते. कच्चा बदाम असो किंवा बसपन का प्यार असो, सोशल मीडियाने अनेकांना रातोरात स्टार केली आहे. सध्या असाच एका मराठी मुलीच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओची नक्की बातमी चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, सध्या सोशल मीडियावर एका मराठी मुलीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्याने तरुणाईला चांगलेच वेड लावले आहे. हा व्हायरल व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला नाचण्याची इच्छा होईल असाच हा व्हिडिओ आहे. आत्तापर्यंत आपण नऊवारीत डान्स, लावणी असे प्रकार अनेकदा पाहिले असतील. मात्र या व्हायरल व्हिडिओमधील मुलीने डान्स नव्हेतर चक्क नऊवारीत रॅप केला आहे. ज्याच्या व्हिडिओने सर्वांनाच थक्क केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by PUNEH????PHOPPP (@punehiphoppp)

आर्या जाधव असे या रॅप गायिकेचे नाव असून ती अमरावतीची आहे. ती एक प्रसिद्ध रॅप गायक असून हसल 2.0 या कार्यक्रमाची ती स्पर्धेक आहे. रॅप गायकांसाठीच असलेल्या या कार्यक्रमात तिने हा रॅप गायला आहे. हा रॅप पाहिल्यानंतर तिचे परिक्षकांनी जोरदार कौतुक करत अमरावतीची एक पोरगी 10 पोरींवर भारी अशा शब्दात तिचे कौतुक केले आहे. सध्या आर्याच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घातला असून त्यावर जबरदस्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. दरम्यान आर्या जाधव सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असून तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- वडिलांसमान राजूंच्या अंत्यसंस्काराला भाऊच होता गैरहजर, कारण जाणून तुम्हीही व्हाल भावूक
सोनाली पाटीलच्या घायाळ करणाऱ्या अदा! पाहून हरपेल भान
दाक्षिणात्य अभिनेत्रीने गायले लता मंगेशकर यांचे गाणे, पण मागावी लागली चाहत्यांची माफी, पाहा काय आहे प्रकरण?

 

हे देखील वाचा