×

पैसे मागणाऱ्या गरीब मुलांना पाहून रश्मिका मंदान्नाने केलं ‘असं’ काही, सोशल मीडियावर व्यक्त केला जातोय संताप!

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) सध्या ‘पुष्पा द राइज’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. रश्मिकाने अल्लू अर्जुनसोबत (Allu Arjun) या चित्रपटात काम केले आहे, ज्यामध्ये दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. अशातच सोमवारी (२४ जानेवारी) रश्मिका मुंबईत स्पॉट झाली होती, ज्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये असं काही घडलं की, नेटकऱ्यांनी रश्मिकाला जबरदस्त ट्रोल करायला सुरुवात केली.

व्हिडिओ पाहून भडकले युजर्स
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रश्मिका मंदान्ना एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असताना, काही मुले तिला घेरतात. ते रश्मिकाकडे पैसे मागतात, पण रश्मिका फारसे लक्ष देत नाही. ती पॅपराजींसमोर पोझ देऊन तिच्या कारमध्ये बसते. यानंतर एक मुलगी रश्मिकाला बोलते, “दीदी तुमचा पिक्चर आहे ना पुष्पा.” तेवढ्यात दुसरी मुलगी येते, ती रश्मिकाला म्हणते, “दीदी थोडे पैसे द्या, काहीतरी खायचं आहे.” पण रश्मिका त्यांना पैसे देत नाही आणि तिथून निघून जाते. (rashmika mandanna slammed by netizens for not helping poor kids video viral)

View this post on Instagram

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

रश्मिकाला ऐकवले बरे-वाईट!
काही युजर्सला रश्मिकाचे हे वागणे अजिबात आवडले नाही आणि त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. रश्मिकाने त्या गरीब मुलांना मदत करायला हवी होती, असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. “काही पैसे दिले असते तर काय झाले असते?” असे युजर्स म्हणत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “हे पाहून मूड ऑफ झाला.” दुसऱ्याने लिहिले, “जर काही खायला दिले असते तर काय झाले असते.” आणखी एका युजरने लिहिले, “हे लोक पैशाने श्रीमंत आहेत पण मनाने गरीब आहेत.” एकाने कमेंट केली, “मुलांबद्दल खूप वाईट वाटतंय. किमान १०० रुपयेच दिले असते.” अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर तुम्हाला पाहायला मिळतील.

लवकरच बॉलिवूडमध्ये करणार धमाल
रश्मिकाने ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटात श्रीवल्लीची भूमिका साकारली होती, जी खूप पसंत केली गेली. या चित्रपटाने केवळ दक्षिणेतच नाही, तर उत्तर भारतातही चांगली कमाई केली आहे. लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. ‘पुष्पा: द राइज’नंतर रश्मिका मंदान्नाची लोकप्रियता पाहून बॉलिवूडच्या अनेक निर्मात्यांनी तिला चित्रपटाच्या ऑफर दिल्या आहेत. ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटात दिसणार आहे. ज्याचे दिग्दर्शन शंतनू बागची करत आहेत.

हेही वाचा :

Latest Post