गोष्ट आहे अभिमानाची, रविनाच्या मुलीची! आई रविनाला अभिमान वाटेल अशी गोष्ट मुलीने करुन दाखवली


आई वडिलांसाठी त्यांची मुलं खूपच खास असतात. मुलांची प्रगती, त्यांची कामगिरी नेहमीच आई वडिलांसाठी अभिमानाचे मौल्यवाण क्षण देतात. मुलांच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी देखील पालकांसाठी मोठा आनंद देऊन जातात. जर मुलांनी कमी वयात मोठी कामगिरी केली असेल तर? मग तर आई वडिलांसाठी आकाशच ठेंगे होते. अशाच एका अभिमानाच्या घटनेचा आनंद सध्या बॉलीवूडची मस्त मस्त गर्ल रविना टंडन घेत आहे.

रवीनाने नुकताच तिचा आणि तिच्या मुलीचा एक फोटो सोशल मीडिया अकाऊंटवरून शेयर करत एका बातमी सांगितली आहे. रविना टंडनची मुलगी राशा संदर्भात तिने एक आनंदाची माहिती दिली आहे. रवीनाने सांगितले की, तिच्या मुलीने ताइक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. मार्शल आर्ट्सचा फॉर्म असलेल्या ताइक्वांदोमध्ये राशाने एवढे मोठे यश संपादन केल्याने रवीनाने ही पोस्ट शेयर करत ही बातमी सर्वांना सांगितली.

रवीनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, ” माझी मुलगी ब्लॅक बेल्ट! तुझा खूप अभिमान आहे. ज्या पद्धतीने तू सर्व नियम आणि अटी पाळताना बिलकुल तुझे मास्क काढले नाही. ही गोष्ट खूप चांगली आहे. परीक्षेच्या काळात स्व सुरक्षा महत्वाची. तू ज्या प्रकारे म्हणाली, ‘मला उद्या शाळेत जायचे’ ये मला खूप आवडले.” यासोबत रवीनाने तिचा तिच्या मुलीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. शिवाय राशाला मिळालेल्या सर्टिफिकेटचा देखील एक फोटो तिने पोस्ट केला आहे.

रविना टंडनच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी आणि कलाकारांनी देखील कमेंट्स करत रविनाच्या मुलींना सेल्फ डिफेन्स शिकण्याच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. रविना टंडनने चित्रपट डिस्ट्रिब्युटर अनिल थडानीसोबत लग्न केले असून त्यांना राशा आणि रणवीरवर्धन ही दोन मुले आहेत.

रविना लवकरच ‘के जी एफ २’ मध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.