दु:खद! राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाचे निधन; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला शोक


बॉलिवूडमधून एकापाठोपाठ एक वाईट बातम्या येत आहेत. अशातच आता आणखी एक वाईट बातमी आली आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांचे वयाशी संबंधित आजारांनी गुरुवारी (१० जून) निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबात त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक दीर्घकाळापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. तसेच त्यांना आठवड्यातून दोनदा नियमित डायलिसिस करावे लागत होते, अशीही माहिती त्यांच्या कुटुंबाने दिली.

त्यांच्या निधनावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “प्रसिद्ध चित्रपटनिर्माते बुद्धदेव दासगुप्ता यांच्या निधनाने दु:खी आहे. आपल्या कामातून त्यांनी चित्रपटाची भाषा अनोखी बनवली. त्यांचे निधन चित्रपटसृष्टीसाठी खूप नुकसान आहे. त्यांचे कुटुंब, सहकारी आणि चाहत्यांसाठी माझ्या संवदेना.”

याव्यतिरिक्त दासगुप्ता यांच्या निधनावर गौतम घोष यांनी म्हटले की, “बुद्ध दा आजारी असूनही चित्रपटांची निर्मिती करत होते. ते लेख लिहित होते. तसेच सक्रियही होते. त्यांनी आजारी असूनही टोपे आणि उरोजहाज यांचे दिग्दर्शन केले. त्यांच्या निधनाने आपल्या सर्वांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.”

याव्यतिरिक्त अभिनेते दीपांकर यांनी म्हटले की, “मी खूप हैराण आणि दु:खी आहे. मी त्यांच्यासोबत एका चित्रपटावर काम केले होते. मिथुन आणि मी खूप मेहनत घेतली होती. प्रत्येक शॉट ते काळजीपूर्वक घ्यायचे. ते सकाळी ४ वाजता उठायचे. त्यांच्या सर्व कामांमध्ये काव्यात्मक गुण होते.”

दासगुप्ता हे १९८० आणि १९९० च्या दशकात गौतम घोष आणि अपर्णा सेनसोबत बंगालमध्ये पॅरेलल चित्रपट घेऊन आले होते. आतापर्यंत दासगुप्ता यांच्या पाच चित्रपटांना सर्वोत्तम फिचर फिल्मसाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त दोन चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्तम दिग्दर्शकासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.

त्यांनी ‘कालपुरुष’, ‘उत्तरा’, ‘बाघ बहादूर’, ‘स्निफर’, ‘कॅरेक्टर’, ‘द फ्लाईट’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हम तो तेरे आशिक है’ मालिकेच्या आठवणीत प्रसाद ओकने शेअर केली पोस्ट; चाहते करतायेत मालिकेच्या दुसऱ्या पर्वाची मागणी

-सोनम कपूरच्या वाढदिवशी वडील अनिल कपूरने केला बालपणीचा फोटो शेअर; म्हणाले, ‘मला तुझी खूप आठवण येतेय…’

-सनी लिओनीने हवेत उडून केला जबरदस्त स्टंट; व्हिडिओ शेअर करत म्हणते, ‘आता माझी सटकली’

-व्हिडिओ: शिल्पा शेट्टीच्या वाढदिवशी पती राज कुंद्रा झाला रोमँटिक; म्हणाला, ‘तुझ्याशिवाय मी कुणीच नाही…’


Leave A Reply

Your email address will not be published.