Tuesday, June 18, 2024

‘फिटनेस फ्रिक’ बनत चाललीये रिंकू राजगुरू, लेटेस्ट फोटोतील टोन्ड बॉडी पाहून चाहत्यांना लागलं ‘याड!’

सध्याच्या कोरोना काळात स्वतःच्या तंदुरुस्तीकडे लक्ष देणे खूप आवश्यक आहे. यावेळी आपण स्वतःला जितके फिट ठेऊ, तितके चांगले आहे. कलाकार मंडळी देखील स्वतः च्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसत आहेत. याच फिट ऍंड फाईन कलाकारांमध्ये आता ‘सैराट फेम रिंकू राजगुरूचाही समावेश झाला आहे. होय चाहत्यांची लाडकी आर्चीही स्वतः च्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतेय.

नुकतेच रिंकूचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यात तिची कमालीची फिटनेस पाहायला मिळाली आहे. हे फोटो स्वतः रिंकूने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या या दोन फोटोमध्ये तिने बॉडी फिटेड ब्रा आणि पँट घातली आहे. तिचे हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वांनीच तोंडात बोटे घातली आहेत. तिचा हा हॉट अंदाज पाहून, ती सिनेसृष्टीतल्या ‘फिट ऍंड फाईन’ कलाकारांच्या यादीत सामील झाली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

हे फोटो पाहून रिंकूच्या चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. या चर्चेचा परिणाम फोटोच्या कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळत आहे. चाहत्यांनी फोटोवर कौतुकांचा पाऊस पाडला आहे. एका युजरने लिहिले, “तू कितनी बदल गयी रे रिंकू.” तर बाकी सर्वजण तिच्या मेहनतीचं कौतुक करताना दिसत आहेत.

रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती आगामी काळात प्रार्थना बेहेरे, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना या कलाकारांसोबत ‘छूमंतर’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. तसेच रिंकूचा ‘झुंड’ हिंदी चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाय ती हिंदी वेबसीरिज ‘जस्टिस डिलिव्हर्ड’ मध्येही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘डॅड स्टॉप इट यार!’, एनसीबीच्या ऑफिसबाहेर वडिलांचे वागणे पाहून वैतागला आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंट

-Bigg Boss 15: रितेशच्या अगोदर एका डॉनसोबत होतं राखी सावंतचं अफेअर, स्वतः केला खुलासा

-‘फिट ऍंड फाईन’ दिसणारे अनिल कपूर ‘या’ आजाराने आहेत त्रस्त, व्हिडिओ शेअर करत स्वत: केला खुलासा

हे देखील वाचा