रिंकू राजगुरूचा नवीन लूक समोर, रावडी क्वीनने वेधले अवघ्या सोशल मीडियाचे लक्ष


चित्रपटसृष्टीत पदार्पण करून आपले स्थान निर्माण करणे आणि महत्वाचं म्हणजे ते स्थान टिकवून ठेवणे ही कलाकारासाठी कसरतीचा गोष्ट आहे. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण करून ‘याड लागलं’ म्हणत अवघ्या प्रेक्षक वर्गाला प्रेमात पाडणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. तिने तिच्या पहिल्या चित्रपटाने एवढी ओळख निर्माण केली की, तिला आजही तिच्या चित्रपटातील नावाने सगळे ओळखतात. रिंकू चित्रपटात तर व्यस्त असतेच, परंतु या सगळ्यातून ती वेळ काढून तिच्या चाहत्यांसाठी तिचे वेगवेगळे फोटो शेअर करत असते. अशातच तिचा एक डॅशिंग लूक समोर आला आहे.

रिंकूने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने जीन्स आणि पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला आहे. यावर तिने आकाशी रंगाचा चेक्सचा शर्ट घातला आहे. तिने केसांची पोनीटेल घालून डोळ्यांवर चष्मा घातला आहे. या लूकमध्ये ती खूपच डॅशिंग दिसत आहे. (Rinku Rajguru’s share her new photos on social media)

rinku rajguru insta post
Photo Courtesy: Instagram/iamrinkurajguru

हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “तुमची अपूर्णता तुम्हाला अद्वितीय बनवते.” तिचे चाहते तिच्या या पोस्टवर अनेक कमेंट करत आहेत. अनेकांना तिचा हा लूक खूप आवडला आहे. चाहते सातत्याने या फोटोवर कमेंट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “ब्युटी डॉन.” तसेच दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “रावडी स्टाईल.” तसेच बाकी अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Rinku Rajguru insta post
Photo Courtesy: Instagram/iamrinkurajguru

रिंकूने नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिच्या या चित्रपटाचा केवळ महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशात गाजावाजा झाला. या चित्रपटाने तिची ओळख निर्माण केली. चित्रपटात तिच्यासोबत आकाश ठोसर मुख्य भूमिकेत होता. त्यांची आर्ची आणि परशाची जोडी खूप गाजली होती. यानंतर रिंकूने ‘कागर’ आणि ‘मेकअप’ या चित्रपटात काम केले.

हेही वाचा :

‘आजपर्यंत माझ्यासोबत असे घडले नाही’, ‘८३’ रिलीझ झाल्यानंतर रणवीरने केला मोठा खुलासा

मोठी बातमी! पनवेलच्या फार्म हाऊसवर सलमान खानला चावला साप

प्रियांका चोप्रानंतर आता आई मधु चोप्राचं इंस्टाग्राम बायो आलं चर्चेत, जावयाबद्दल लिहीली ‘ही’ गोष्ट 

 


Latest Post

error: Content is protected !!