मोठी बातमी! पनवेलच्या फार्म हाऊसवर सलमान खानला चावला साप


बॉलिवूडमधील किंग खान म्हणजेच सलमान खान नेहमीच त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याचे चाहते भरपूर असल्याने त्याच्या चाहत्यांना देखील त्याच्याबाबात जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. अशातच त्याच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे की, सलमान खानला साप चावला आहे. पनवेलमध्ये असलेल्या त्याच्या फार्म हाऊसवर असताना त्याला विषारी साप चावला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार त्याला साप चावला आहे. परंतु त्याचा भाईजानवर काही जास्त प्रभाव झाला नाही. साप चावल्यानंतर त्याला मुंबईमधील एमजीएम रुग्णालयात भर्ती केले. त्यानंतर त्याच्यावर उपचार चालू आहेत.

त्याच्यावर उपचार झाल्यानंतर सलमान खान (Salman Khan) रविवारी (२६ डिसेंबर) रोजी सकाळी ९ वाजता पुन्हा एकदा त्याच्या फार्म हाऊसवर आला आहे. त्याची तब्येत आता ठीक आहे आणि तो त्याच्या फार्म हाऊसवर सध्या आराम करत आहे. (Bollywood star Salman Khan gets bitten by snake at his Panvel farmhouse, condition stable)

सलमानबाबत ही बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांना खूप दुःख झाले. सगळेजण त्याच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर चौकशी करत आहे. तसेच तो लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत आहेत. परंतु त्याला चावलेला साप जरी विषारी असला, तरी देखील त्याचा परिणाम सलमानवर झाला नाही ही त्याच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.

सलमान खानचा सोमवारी (२७ डिसेंबर) रोजी ५६ वा वाढदिवस आहे. अशातच त्याच्याबाबत अशी बातमी आल्याने तो त्याचा वाढदिवस कुठे साजरा करेल हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. तो आता त्याच्या फार्म हाऊसवर आराम करणार आहे की, त्याच्या मैत्रांसोबत त्याचा वाढदिवस साजरा करणार आहे. याची माहिती अजून समोर आली नाही. सलमान ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी त्याच्या फार्म हाऊसवर गेला होता. तेव्हाच ही घटना घडली आहे.

हेही वाचा :

प्रियांका चोप्रानंतर आता आई मधु चोप्राचं इंस्टाग्राम बायो आलं चर्चेत, जावयाबद्दल लिहीली ‘ही’ गोष्ट

खऱ्या आयुष्यात सासू बनल्या स्मृती इराणी, ‘तुलसी’ने सर्वांसमोर दिली जावयाला चेतावणी

जॅकलिन-नोराच नाही, तर सुकेश चंद्रशेखर प्रकरणात होणार आणखी ५ बॉलिवूड अभिनेत्रींची चौकशी 

 


Latest Post

error: Content is protected !!