पत्नी जेनेलियापुढे रितेशची माघार! शेवटी हात जोडून मागितली माफी; व्हिडिओ जबरदस्त व्हायरल


‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. यातील खास गोष्ट ही आहे की, या चित्रपटात त्याच्यासोबत त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा ही होती. पण कोणाला माहीत होते की, ऑनस्क्रीन एवढी रोमँटिक वाटणारी जोडी पुढे भविष्यात एकमेकांचे जीवन साथी बनणार आहेत. त्या दोघांनी 2012 साली लग्न केले होते. रितेश आणि जेनेलिया हे बॉलिवूडमधील सर्वात रोमँटिक आणि मजेशीर जोडपे आहेत. याचा प्रत्यय प्रेक्षकांना त्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडिओवरून वारंवार आलाच आहे. ते नेहमीच त्यांच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत असतात. असाच या दिवसात त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धमाल करताना दिसत आहे. (Riteish Deshmukh and Genelia deshmukh’s new video viral on social media)

रितेश आणि जेनेलियाची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. ते कधीच त्यांच्या चाहत्यांना नाराज करत नाहीत. त्यांचा एक व्हिडिओ सध्या प्रेक्षकांना खूपच आवडत आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जेनेलिया ही रितेश देशमुखला खूप बोलत असते. ती एवढं बोलते की, रितेश बोर होतो. तो जांभया द्यायला लागतो. हे पाहून जेनेलियाला खूप राग येतो. ती परत तिचं बोलणं चालू करते. पत्नीच्या रागासमोर तो त्याची चूक मान्य करून शेवटी तिच्यासमोर हात जोडतो. या मजेशीर व्हिडिओला आतापर्यंत 3.3 मिलियनपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

रितेश देशमुखच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याआधी तो ‘बाघी 3’ मध्ये दिसला होता. तसेच याआधी त्याने ‘हाऊसफुल’ या चित्रपटात काम केले आहे. जेनेलियाने ‘मस्ती’, ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फ्लॉप ऍक्टर ठरूनही रॉयल जीवन जगतोय अभिनेता आफताब; तर वयाच्या ३८व्या वर्षी दुसऱ्यांदा अडकला लग्नगाठीत

-केरळ हायकोर्टाकडून चित्रपट निर्माती आयशा सुल्तानाला अटकपूर्व जामीन मंजूर; भाजप नेत्याविरुद्ध केले होते वक्तव्य

-कपूर घराण्याचे नियम तोडत करिश्माने केले होते अभिनयात पदार्पण; वाचा अभिनेत्रीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी


Leave A Reply

Your email address will not be published.