‘…भररस्त्यात चोपला पाहिजे!’ वैद्यकीय वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर संतापला रितेश देशमुख

riteish deshmukh got angry on selling fake drugs on coronavirus


इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोना प्रकारणांनी उच्चांक गाठला आहे. लाखो लोक दरदिवशी मृत्युमुखी पडत आहेत. देशभरात बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशा अत्यावश्यक गोष्टींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. अशा हलाखीच्या परिस्थितीत रेमडेसिविर इंजेक्शन कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे. मात्र, यावेळी एकमेकांना मदत न करता, काहीजण इंजेक्शनचा काळाबाजार करत आहेत. कोरोना महामारीच्या काळात मृत्यूशी झुंज देत असलेल्या रुग्णांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत, सर्वत्र मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू आहे. आता ही परिस्थिती पाहून अभिनेता रितेश देशमुख प्रचंड संतापला आहे.

रितेश देशमुख सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. मजेदार व्हिडिओ शेअर करण्याव्यतिरिक्त, तो समाजातील महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करतानाही बऱ्याच वेळा दिसतो. नुकतेच त्याने आपल्या ट्विटरवरून एका ट्विटला रिट्विट केले आहे. त्याने इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. “औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे,” असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

वास्तविक, नागपूरमधील एका कोरोना रुग्णाला रेमडेसिविर या इंजेक्शनाऐवजी ऍसिडिटीचे इंजेक्शन देण्यात आले. हे पाहता रितेशला आपला राग अनावर झाला. वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या या काळ्याबाजारावर अनेक कलाकारांनीही यापूर्वी राग व्यक्त केला आहे. याव्यतिरिक्त वेगवेगळे कलाकार गरजूंना मदत करायला पुढे सरसावले आहेत. यासोबत ते इतरांनाही मदत करण्याचे आवाहन करत आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर रितेश देशमुख अखेरच्या वेळेस ‘बागी ३’ मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते. याशिवाय रितेश अनेक चित्रपटात काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जगावेगळं! बिझनेसमॅनच्या अंत्यसंस्कारात रडण्यासाठी चंकी पांडेंना मिळाली होती ५ लाखांची ऑफर, कारण वाचून बसेल शॉक

-चित्रपटांपासून दूर असलेली अभिनेत्री करतेय शेती, पाहा आंब्याच्या बागेतील जुही चावलाचे व्हायरल फोटो

-दिवंगत अभिनेता सुशांतच्या जीवनावरून शाळेतील मुलं शिकणार कुटुंबाचे महत्त्व, अभिनेत्याचा फोटोचा पुस्तकात समावेश


Leave A Reply

Your email address will not be published.