‘लय भारी’ चित्रपटाला ७ वर्ष पूर्ण; निशिकांत कामत यांची आठवण काढत, रितेश देशमुख झाला भावुक


‘माऊली माऊली’ म्हणत आख्ख्या मराठी चित्रपटसृष्टीला वेड लावणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख होय. रितेश देशमुखने अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. पण संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले, ते त्याच्या ‘लय भारी’ या चित्रपटाने. त्याच्या या चित्रपटाला ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त त्याने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. (Riteish Deshmukh movie lai bhaari complete 7 years, actor share a video while remembaring Nishikant kamat)

रितेश देशमुखने ‘लय भारी’ चित्रपटाला ७ वर्ष पूर्ण झाल्याने, सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये व्हिडिओच्या तीन विंडो दिसत आहेत. यामध्ये या चित्रपटातील काही सीन दाखवले आहेत. सोबतच रितेश देशमुखचे लोकप्रिय डायलॉग चालू आहेत. यामध्ये तो म्हणत आहे की, ‘आपला हात भारी, आपली लाथ भारी, आपलं सगळंच लय भारी.’ त्याने हा व्हिडिओ शेअर करून चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्याने लिहिले आहे की, “सात वर्षाची तुमची साथ भारी, मिस यू निशी.” येथे तो निशिकांत कामत यांची आठवण काढताना भावुक झाला आहे.

निशिकांत कामत यांनी २०१४ साली ‘लय भारी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. मागच्या वर्षी १७ ऑगस्ट २०२० मध्ये त्यांचे निधन झाले आहे.

त्यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील कमाल केली होती. या चित्रपटात रितेश देशमुखसोबत शरद केळकर, राधिका आपटे, आदिती सुधीर पोहनकर, जान्हवी आझमी, संजय खापरे तसेच एका गाण्यात जेनेलिया देशमुख देखील होती. या कलाकारांनी या चित्रपटात धमाल केली होती.

रितेश देशमुखने अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘तुझे मेरी कसम’, ‘धमाल’, ‘हाऊसफुल’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘एक विलन’, ‘मस्ती’, ‘बाघी ३’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हनुमाना’च्या भूमिकेने मिळवली होती तुफान लोकप्रियता; तर दारा सिंग यांच्यासोबत काम करताना घाबरायच्या अभिनेत्री

-सारा अली खानने दिली कामाख्या देवीच्या मंदिराला भेट; फोटो पाहून युजर्सने पाडला धर्मावरून प्रश्नांचा पाऊस

-वाचा हिंदी चित्रपटांमध्ये ‘प्राण’ टाकणाऱ्या अभिनेत्याची कहाणी; खलनायकी साकारून नायकालाही दिलीय त्यांनी टक्कर


Leave A Reply

Your email address will not be published.