Wednesday, May 20, 2026
Home कॅलेंडर रिया चक्रवर्तीबरोबर फोटो शेअर करणं अभिनेत्याला पडलं भलतंच महागात, थेट पोस्ट डिलीट करत म्हणतोय…

रिया चक्रवर्तीबरोबर फोटो शेअर करणं अभिनेत्याला पडलं भलतंच महागात, थेट पोस्ट डिलीट करत म्हणतोय…

दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला ड्रग्स केसमध्ये अटक झाल्यानंतर ती जणू बॉलीवूडमधून गायबच झाली. रियावर अनेक आरोप कण्यात आले. त्यातच तिला अटक देखील झाली आणि एक महिन्याने तिला जमीन मंजूर झाला.

त्यानंतर तिचे नुकतेच सोशल मीडियावर रोडीज फेम राजीव लक्ष्मण सोबत काही फोटो वायरल झाले आहे. त्यामुळे राजीवला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

बऱ्याच दिवसांनी रिया व्हीजे अनुषा दांडेकरच्या बर्थडे पार्टीमध्ये गेली होती. तिथे तिची भेट राजीवसोबत झाली. राजीवने त्याचे आणि रियाचे काही फोटो ‘माय गर्ल’ नावाने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये रिया खुप आनंदी दिसत होती. मात्र राजीवला हे फोटो पोस्ट करणे खूप महागात पडले आहे. हे फोटो पाहून राजीवला खूप ट्रोल केले जात आहे. हे फोटो खूपच कमी वेळात मोठ्या प्रमाणावर वायरल झाले.

या फोटोंना पाहून काही लोकांनी रियाला एवढ्या लवकर मूव्हऑन केल्याबद्दल ट्रोल करत आहे तर राजीवला तिच्यासोबत असण्यामुळे. हे सर्व पाहून राजीवने पटकन रियासोबत असलेले सर्व फोटो डिलीट केले. पण तोपर्यंत हे फोटो वायरल झाले होते. रवीने पुन्हा एक पोस्ट करत त्यामध्ये त्याची बाजू स्पष्ट केली.

राजीवने त्याच्या नवीन पोस्टमध्ये लिहिले की, “मला असे वाटते की मी पोस्ट करताना काही चुकीच्या शब्दांचा वापर केल्यामुळे मला हा त्रास होत आहे. पण मी एक सांगू इच्छितो, रिया माझी खूप जुनी मैत्रीण असून आम्ही खूप दिवसांनी भेटलो असल्यामुळे मी खूप खुश होतो. मी रियाचा चांगल्यासाठी प्रार्थना करतो.” हि पोस्ट शेयर करताना राजीवने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटची कमेंट सेक्शन बंद केले आहे, जेणे करून कोणीही या पोस्टला कमेंट करू शकत नाही.

सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रियासाठी खूप मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या होत्या. मात्र आता रिया हळू हळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसत आहे. रियाला कोणत्याच पार्टी किंवा इव्हेंटमध्ये पाहिले गेले नाही. काही दिवसांपूर्वी रियाला आणि तिच्या कुटुंबाला मुंबईच्या काही भागात घर शोधताना पाहिले गेले होते.

हे देखील वाचा