‘बिनधास्त’ अभिनेत्री सई ताम्हणकरच्या ग्लॅमरस अदांची चाहत्यांना भुरळ; व्हिडिओवर पडतोय लाईक्सचा पाऊस


सिनेसृष्टीत बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. तिने तिच्या बोल्ड ऍंड बिनधास्त अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. सोबत ती तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते. आपले बोल्ड अन् ग्लॅमरस फोटोशूट ती बऱ्याचवेळा सोशल मीडियावर शेअर करते. पुन्हा अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.

वास्तविक या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीचे काही फोटो पाहायला मिळतील. हा व्हिडिओ तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओमधील सईचा लूक अगदी पाहण्यासारखा आहे. तुम्ही पाहू शकता की, यात तिने केशरी आणि पिवळ्या रंगाचा लॉंग ड्रेस परिधान केला आहे, ज्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे. तिने ज्याप्रकारे हा सुंदर ड्रेस कॅरी केला आहे, तो अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

सईच्या या व्हिडिओची आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. चाहते यावर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहे. व्हिडिओचे कमेंट सेक्शन पाहिले, तर ते तिच्या कौतुकांनी भरलेले दिसेल. व्हिडिओला आतापर्यंत १९ हजाराहून अधिक युजर्सने लाईक केले आहे. यापूर्वीही बऱ्याचदा सईने आपल्या अदांनी चाहत्यांना पुरते वेडे करून सोडले आहे.

सई ताम्हणकर तिच्या ‘दुनियादारी’, ‘बालक पालक’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट’ या चित्रपटांसाठी ओळखली जाते. विशेष म्हणजे तिने ‘हंटर’, ‘गजनी’ या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारून आपली खास ओळख निर्माण केली आहे.

सईच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती येत्या काळात ‘कलरफुल’ या चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात सई मीराच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय सई ताम्हणकर लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘मिमी’ या हिंदी चित्रपटात ती काम करताना दिसणार आहे. यात तिच्यासोबत क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मानलं भावा तुला! लाडक्या अभिनेत्याला भेटण्यासाठी चाहत्याचा हैदराबाद ते मुंबई अनवाणी पायांनी प्रवास; सोनूनेही मानले आभार

-मोठी बातमी! भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादववर गुन्हा दाखल; महिलांबद्दल अश्लील गाणे बनवल्याचा आरोप

-‘ये परदा हटा दो’ गाण्यावरील मानसी नाईकच्या एक्सप्रेशन्सवर तिचा पतीही झाला फिदा; कमेंट करत म्हणतोय, ‘ये चांद…’


Leave A Reply

Your email address will not be published.