Tuesday, June 25, 2024

सई ताम्हणकरच्या हॉटनेसचा सोशल मीडियावर धुराळा, ग्लॅमरस फोटो आला समोर

‘हंटर’ चित्रपटात झळकलेली मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती बर्‍याचदा तिच्या इंस्टाग्राम हँडलवर स्वतःचे फोटो पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते. तिला मराठी सिनेसृष्टीत ‘बोल्ड ऍंड बिनधास्त’ अभिनेत्री म्हणूनही ओळखले जाते. अभिनयाला बाबतीत तर तिची बातच काही और आहे! सतत निरनिराळे फोटोशूट्स शेअर करून ती चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवते. नुकताच समोर आलेला तिचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सईचा हा फोटो राजश्री मराठीच्या अधिकृत अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये सईने फिकट हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे. ज्यात ती अतिशय हॉट दिसत आहे. अभिनेत्रीच्या लूकबद्दल बोलायचे झाले, तर तिने केस बांधले आहेत. सोबतच तिने हा लूक पूर्ण करण्यासाठी गोल्डन एअरिंग आणि ब्रेसलेट घातले आहे.

सईच्या या फोटोची आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. चाहते यावर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहे. फोटोला आतापर्यंत १ हजाराहून अधिक युजर्सने लाईक केले आहे. यापूर्वीही बऱ्याचदा सईने आपल्या अदांनी चाहत्यांना पुरते वेडे करून सोडले आहे.

सई ताम्हणकर तिच्या ‘दुनियादारी’, ‘बालक पालक’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट’ या चित्रपटांसाठी ओळखली जाते. विशेष म्हणजे तिने ‘हंटर’, ‘गजनी’ या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारून आपली खास ओळख निर्माण केली आहे.

ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच ‘कलरफुल’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात सई मीराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ही एक लव्हस्टोरी आहे. तसेच सई ताम्हणकर हिंदी इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘मिमी’ या हिंदी चित्रपटात ती झळकली आहे. यात तिच्यासोबत क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा