सलमान अन् बहीण अलवीराविरुद्ध फसवणुकीचा आरोप; व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर पाठवले समन्स


अनेक कलाकार हे कधीच फक्त अभिनय एके अभिनय असे करताना दिसत नाहीत. चित्रपट आणि अभिनय याव्यतिरिक्त देखील कलाकार विविध क्षेत्रात कार्यरत असतात. हॉटेलिंग, सेक्युरिटी ऍजन्सी, प्रॉडक्शन, कन्स्ट्रक्शन आदी अनेक क्षेत्रांमध्ये कलाकार आपली गुंतवणूक करतात. अगदी बोटावर मोजण्या इतकेच कलाकार असे असतील, जे फक्त अभिनयच करतात. अशा गुंतवणुकीमध्ये सलमान खान देखील अपवाद नाही. त्याने स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले आहे. तसेच तो ‘बिंग ह्युमन’ नावाची एनजीओ देखील चालवतो. याच नावाने त्याने एक ब्रँड देखील सुरू केला आहे.

सलमान खान हा गरिबांचा आणि गरजूंच्या वाली म्हणून ओळखला जातो. गरजू लोकांना मदत करण्यासाठी तो नेहमी पुढे असतो, अशा वेळी जर त्याच्यावरच कोणी फसवणुकीचा आरोप लावला तर…? तुम्ही म्हणाला शक्यच नाही. मात्र, सलमानवर आणि त्याच्या बहिणीवर अलवीरावर चंदिगढच्या एका व्यापाऱ्याने फसवणुकीचा आरोप लावला आहे.

व्यापारी अरुण गुप्ता यांनी सलमान आणि अलवीरा यांच्याविरोधात तक्रार करताना म्हटले, “सलमान खानने मला बिग बॉसच्या सेटवर बोलावून सांगितले होते की, तुम्ही शोरूम सुरू करा, मी तुम्हाला सर्व मदत करेल. मी सलमान खानच्या सांगण्यावरून मनीमाजरा येथे नॉन रेसिडेंशिअल भागात ३ कोटी रुपयांची गुंतवणूक करून ‘बिंग ह्युमन ज्वेलरी’ हे दुकान सुरू केले. हे दुकान सुरू करण्यासाठी मी स्टाईल क्विटेट ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेडशी एक करार देखील केला. सलमानने माझ्याकडून दुकान तर चालू करून घेतले. मात्र, मला कोणतीही मदत केली नाही. शोरूम सुरू झाल्यानंतर कंपनीने दिल्लीवरून मला माल पाठवणे बंद केले. सोबतच त्यांनी त्यांची वेबसाईट देखील बंद केली आहे.”

व्यापाऱ्याने पुढे सांगितले की, “मला ज्या बिंग ह्युमन शोरूममधून ज्वेलरी खरेदी करण्यास सांगितले होते, ते शोरूम देखील बंद झाले आहे. त्यामुळे मला सामान पण मिळत नाही. सोबतच सलमानने मला या माझ्या शोरूमच्या उद्घाटसाठी येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, कामात व्यस्त असल्याने तो आला नव्हता.”

पोलिसांकडे ही तक्रार नोंदवल्यानंतर लगेच त्यांनी सलमान खान त्याची बहीण अलवीरा खान बिंग ह्युमन कंपनीचे सीईओ प्रसाद कपारे, अधिकारी अनूप, मानव, संजय रंगा, संतोष श्रीवास्तव, आलोक यांच्याविरोधात समन्स काढले आहे. या प्रकरणात सलमान आणि अन्य लोकांना दहा दिवसांच्या आत उत्तर द्यायला सांगितले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेत्री शगुफ्ता अलीच्या मदतीसाठी धावला जॉनी लिव्हर; आर्थिक खर्च भागवण्यासाठी विकल्यात घरातील वस्तू

-तापसी पन्नूच्या लग्नासाठी आई- वडील चिंतेत; म्हणाले, ‘आता कोणाशीही लग्न कर…’

-नसीरुद्दीन शाह यांना ८ दिवसांनी मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, मुलाने फोटो शेअर करत दिली माहिती


Leave A Reply

Your email address will not be published.