Saturday, July 19, 2025
Home बॉलीवूड निवडणूक लढवण्याच्या बातम्यांवर संजय दत्तने तोडले मौन; म्हणाला, ‘मला या अफवांना पूर्णविराम द्यायचा आहे’

निवडणूक लढवण्याच्या बातम्यांवर संजय दत्तने तोडले मौन; म्हणाला, ‘मला या अफवांना पूर्णविराम द्यायचा आहे’

अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) अनेक दिवसांपासून राजकारणात आल्याने चर्चेत होता. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता हरियाणामधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या येत होत्या. हरियाणातील यमुनानगर मतदारसंघातून ते काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवू शकतात, असे बोलले जात होते, मात्र आता संजय दत्तने या सर्व बातम्यांना पूर्णविराम दिला आहे.

संजय दत्तने या वृत्तांचे खंडन केले असून त्या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. अभिनेता म्हणाला की, तो कोणत्याही पार्टीला जाणार नाही. त्यांनी राजकारणात प्रवेश केला तर ते स्वत: जाहीर करतील. याशिवाय त्याने चाहत्यांना या बातमीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही केले आहे. अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली आहे.

X वर ही माहिती देताना संजय दत्त म्हणाला, “मला राजकारणातील माझ्या सहभागाबाबतच्या सर्व अफवांना पूर्णविराम द्यायचा आहे. मी कोणत्याही पक्षात प्रवेश करत नाही किंवा निवडणूक लढवत नाही. जर मी राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवायचे ठरवले, तर मी त्याची घोषणा करणारा पहिला असेन. आत्तापर्यंत माझ्याबद्दलच्या बातम्यांवर विश्वास ठेवणे टाळा.”

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्ष माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या विरोधात सेलिब्रिटी कार्ड खेळणार असल्याच्या बातम्या येत होत्या. पक्षाच्या हायकमांडनेही संजय दत्तच्या नावाला सहमती दर्शवली होती आणि तेव्हापासून निवडणूक लढवण्यासाठी संजय दत्तचे नाव सातत्याने पुढे येत होते. संजय दत्तचे वडील काँग्रेसच्या मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्री होते अशी माहिती आहे. त्यांची बहीण प्रिया दत्त याही खासदार राहिल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

प्रिती झिंटाने केले ‘क्रू’ चित्रपटाचे कौतुक; म्हणाली, ‘हसण्याचे फुल पॅकेज’
‘या’ चित्रपटातून अक्षय कुमार करणार साऊथमध्ये एंट्री, विष्णू मंचूच्या चित्रपटात होणार सामील

हे देखील वाचा