Saturday, September 21, 2024
Home बॉलीवूड सन ऑफ सरदार 2 मधून संजय दत्त बाहेर ! संजयची अटक ठरली कारणीभूत…

सन ऑफ सरदार 2 मधून संजय दत्त बाहेर ! संजयची अटक ठरली कारणीभूत…

अभिनेता संजय दत्त आणि अजय देवगणची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार होती, पण आता असं होणार नाहीये. २०१२ साली आलेल्या ‘सन ऑफ सरदार’चा सिक्वेल असलेल्या ‘सन ऑफ सरदार 2’मध्ये दोघेही दिसणार होते.पण काही कारणास्तव संजय दत्तला या सिनेमातून माघार घ्यावी लागणार आहे.

संजय दत्त या चित्रपटातून बाहेर जाण्याचे कारण म्हणजे त्याला लंडनचा व्हिसा मिळू शकला नाही आणि चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्याला तिथे जावे लागणार होते. मात्र आता संजय दत्तच्या जागी अभिनेता आणि भाजप खासदार रवी किशनला कास्ट करण्यात आले आहे.

‘सन ऑफ सरदार’मध्ये संजय दत्तने बिल्लू हे पात्र साकारलं होतं. तर अजय देवगण जस्सी रंधवाच्या भूमिकेत दिसला होता. संजय चित्रपटातून बाहेर पडल्याने या दोघांना रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटात मृणाल ठाकूरचीही भूमिका आहे आणि सध्या स्कॉटलंडमध्ये चित्रीकरण सुरू आहे.

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर, जेव्हा संजय दत्त शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला तेव्हा त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली, जी त्याने २०१६ मध्ये पूर्ण केली. अटक झाल्यापासून संजय दत्त आजपर्यंत कधीच यूकेला जाऊ शकलेला नाही. त्याने व्हिसासाठी अनेकवेळा अर्ज केला आहे, परंतु प्रत्येक वेळी अर्ज फेल ठरला.

‘सन ऑफ सरदार’ हा कॉमेडी ॲक्शन चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन अश्वनी धीर यांनी केले होते. अजय देवगण आणि संजय दत्त व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, मुकुल देव, विंदू दारा सिंह, अर्जन बाजवा, तनुजा आणि संजय मिश्रा यांच्यासह अनेक कलाकारांनी यात काम केले होते. या चित्रपटातील ‘पो पो’ गाण्यात सलमान खानही डान्स करताना दिसला होता.

 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

अल्लू अर्जुन करत आहे’पुष्पा 2′ च्या क्लायमॅक्ससाठी ॲक्शन सीक्वेन्स शूट, दाखवली मनोरंजक झलक…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा