देसी क्वीन सपना चौधरीचे ‘इन ऑंखों की मस्‍ती’ गाण्यावर जबरदस्त एक्सप्रेशन पाहून चाहत्यांना भुरळ; एकदा पाहाच


 

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारी सपना तिच्या डान्स व्यतिरिक्त अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सपनाने नुकताच एक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सपना लाल रंगाच्या लेहेंग्यात मेकअप रूममध्ये दिसली आहे.यात ती सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्या ‘उमराव जान’ सिनेमातील ‘इन आंखों की मस्‍ती’ गाण्यावर एक्सप्रेशन देत आहे. या व्हिडिओमधील सपनाचे एक्सप्रेशन पाहून चांगले चांगले लोकं तिच्या अदांवर घायाळ होत आहे. सपनाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, फॅन्स या व्हिडिओवर कमेंट्स करून तिची रेखा यांच्याशी तुलना करत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना सपनाने लिहिले, “तुमच्या सारख्या हजारो दिवान्या लोकांसाठी.” सपनाच्या या व्हिडिओला ६० हजार पेक्षा अधिक यूजर्सने लाईक केले असून, हजारो लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. या कमेंट्समध्ये काहींनी तिला ‘खूप सुंदर’ म्हटले आहे, तर काहींनी तिला ‘तुझ्यासारखे कोणीच नाही’ असे म्हटले. शिवाय काहींनी ‘तू अगदी रेखाजी सारखे एक्सप्रेशन देत आहे, मात्र रेखाजी सर्वात बेस्ट आहे’ असेही लिहिले आहे.

काही वर्षांपूर्वी सपनाने सलमान खानच्या ‘बिग बॉस’ या शो मध्ये सहभाग घेतला होता. या शो ने तिला संपूर्ण जगात लोकप्रियता मिळवून दिली. सपना जिथे जिथे स्टेज शो करते, तिथे आजूबाजूच्या परिसरातून असंख्य फॅन्स तिला आणि तिचा डान्स बघायला येतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फ्लॉप ऍक्टर ठरूनही रॉयल जीवन जगतोय अभिनेता आफताब; तर वयाच्या ३८व्या वर्षी दुसऱ्यांदा अडकला लग्नगाठीत

-केरळ हायकोर्टाकडून चित्रपट निर्माती आयशा सुल्तानाला अटकपूर्व जामीन मंजूर; भाजप नेत्याविरुद्ध केले होते वक्तव्य

-कपूर घराण्याचे नियम तोडत करिश्माने केले होते अभिनयात पदार्पण; वाचा अभिनेत्रीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी


Leave A Reply

Your email address will not be published.