‘बुद्धू बलमा’ गाण्यावर सपना चौधरीने लावले ठुमके; पुन्हा वाढवला सोशल मीडियाचा पारा


हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील ‘डान्सिंग क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सपना चौधरी. ती तिच्या नवनवीन गाण्यांमुळे देशभर प्रसिद्ध आहे. लोकप्रिय डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरीचा प्रत्येक अंदाज तिच्या चाहत्यांना आवडतो. सोशल मीडियावर देखील सपनाचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. ती सोशल मीडियावर तिच्या म्युझिक व्हिडिओ सोबतच नवीन फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या फोटोमुळे ती चाहत्यांचे मन जिंकत असते. तिची गाणी लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात वाजवली जातात. यातच सपनाचा ‘बुद्धू बलमा’ या गाण्यावरील व्हिडिओ यूट्यूबवर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. (Sapna choudhary’s new dance video viral on YouTube)

या गाण्यातील सपना चौधरीचे ठुमके चाहत्यांना वेड लावत आहेत. सपना चौधरीने या गाण्यात हिरव्या रंगाचा ड्रेस घालून मंचावर डान्स केला आहे. तिचा हा अंदाज पाहून तिचे चाहते अक्षरशः कौतुकाचा पाऊस पाडत आहेत. तिचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. सोनोटेक यूट्यूब चॅनलवर हा डान्स व्हिडिओ 12 जूनला शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 33 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. इथूनच आपण सपना चौधरीच्या लोकप्रियतेचा अंदाज लावू शकतो.

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सपना चौधरीचा स्टेज परफॉर्मन्स बघण्यासाठी अनेक लोक पोहोचले आहेत. सपना केवळ हरियाणामध्ये नाहीतर संपूर्ण देशात तिचे प्रोग्राम करत असते. तिची गाणी प्रेक्षकांना खूप आवडत असतात.

सपना अनेक स्टेज शो करत असते. तिची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक खूप आतुर असतात. सपना चौधरीने अनेक हिट गाणी दिली आहेत. ज्यांना कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. तिची ‘गजबन पाणी’, ‘सुलफा’, ‘छोरी बिंदास’, ‘इंग्लिश मिडीयम पढी’ यांसारखी अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत. या गाण्यांच्या लोकप्रियतेमुळे तिला चित्रपटात काम करण्याच्या देखील ऑफर येत असतात. तिने बॉलिवूडमध्ये ‘दोस्ती के साईड एफेक्ट्स’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त चालला नाही, पण सपनाच्या अभिनयाचे सर्वत्र खूप कौतुक झाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-समर सिंगच्या नवीन गाण्याचा यूट्यूबवर धुमाकूळ; पाहायला मिळाला नीलम गिरीचा हॉट अंदाज

-आशुतोष पत्कीने शेअर केला जिममधला फोटो; पाहायला मिळाला बबड्याचा ‘फिट ऍंड फाईन’ लूक

-‘मैं तो खड़ी थी आस लगाए…’, रितिका श्रोत्रीच्या निरागसतेने नेटकऱ्यांना पाडली भुरळ


Leave A Reply

Your email address will not be published.