राहुलच्या ‘या’ आलिशान घरात नववधू बनून येणार अभिनेत्री दिशा परमार; फोटो पाहून फिरतील तुमचे डोळे


मनोरंजनसृष्टीत सध्या लगीनसराईचा काळ सुरु आहे. अनेक जोड्यांनी या कोरोना काळातही लगीनगाठ बांधली आहे. या यादीत आता अजून नाव जोडले जाणार आहे आणि ते म्हणजे गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांचे. बिग बॉसमध्ये असताना राहुलने नॅशनल टेलिव्हिजनवर दिशाला प्रपोज केले होते. त्यानंतर या दोघांच्या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु होती. नुकतेच यांनी त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. येत्या १६ जुलैला हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहे.

गायक आणि बिग बॉस फेम राहुल वैद्य आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री दिशा परमार यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची पत्रिका पोस्ट करत ही माहिती दिली. तारीख जाहीर झाल्यामुळे या दोघांचे फॅन्स या लग्नासाठी खूपच उत्सुक झाले आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखातून राहुल लग्न करून दिशाला ज्या घरात नेणार आहे, त्या घराबद्दल सांगणार आहोत आणि सोबतच त्या घराची झलकही दाखवणार आहोत.

राहुलने अनेकदा सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याच्या घराचे फोटो, व्हिडिओ फॅन्ससोबत शेअर केले आहेत. काही व्हिडिओमध्ये त्याने बेडरूम्स दाखवले, काही व्हिडिओमध्ये किचन तर काही व्हिडिओ, फोटोंमध्ये हॉल आणि लॉबी दिसली. यावरून आपण अंदाज लावू शकतो की, त्याचे पूर्ण घर हे किती आलिशान असेल.

राहुलने लग्नाची तारीख जाहीर करताना शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आमच्या परिवाराच्या आशीर्वादाने, हा खास क्षण तुमच्याबरोबर शेअर करण्यात आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्ही १६ जुलै २०२१ रोजी विवाहबंधनात अडकणार आहोत. आपल्या सर्वांचे प्रेम आणि शुभेच्छा आवश्यक आहेत. लवकरच आम्ही एकत्र एक नवीन अध्याय सुरू करणार आहोत.’ सोबतच त्याने #TheDisHulWedding हा हॅशटॅग देखील वापरला आहे.

राहुल याच्या या पोस्टवर भाष्य करून अनेक सेलिब्रिटी त्यांचे अभिनंदन करत आहेत. राहुलसोबत ‘खतरों के खिलाडी ११’ चा भाग बनलेल्या वरुण सूदने लिहिले, ‘वाह.. हॅपी.’ तर दुसरीकडे, दिव्यांका त्रिपाठीने कमेंट केली, ‘राहुल शुभेच्छा.’

लग्नाबद्दल बोलताना राहुलने एका मुलाखतीत सांगितले होते की, “दिशा आणि मला नेहमीच काही लोकांच्या उपस्थितीत खासगी समारंभात लग्न करायचे होते. आमच्या प्रियजनांनी आम्हाला या विशेष दिवशी आशीर्वाद द्यावा अशी आमची इच्छा होती. आमचे हे लग्न वैदिक विधीनुसार होणार असून, सोबतच गुरबानी शबद सेरेमनी देखील होणार आहे.

गायक राहुल वैद्य यांने दिशा परमारला ‘बिग बॉस १४’च्या घरात, नॅशनल टेलिव्हिजनवर प्रपोज केले होते. यानंतर दिशा परमार त्याला भेटायला आली होती आणि तिने राहुलचा प्रस्ताव देखील मान्य केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.