Monday, October 27, 2025
Home अन्य निया शर्माचे लेहंग्यातील हटके लूक्स घालतील तुम्हालाही भुरळ; मॉडर्न महिलांसाठी आहे एकदम परफेक्ट

निया शर्माचे लेहंग्यातील हटके लूक्स घालतील तुम्हालाही भुरळ; मॉडर्न महिलांसाठी आहे एकदम परफेक्ट

अभिनेत्री निया शर्मा ही तिच्या लूक आणि बोल्डनेसने अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत असते. तिच्या फॅशन सेन्समुळे आणि लूकमुळे ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचा लूक पाहून तिचे चाहते तर पुरते वेडे होतात. प्रत्येक दिवशी ती तिच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर आग लावत असते. नेहमीच हॉट फोटोंनी धुमाकूळ घालणाऱ्या नियाचा हा लूक आधुनिक महिलांसाठी एकदम परफेक्ट आहे. (See the glamorous photos of actress Nia Sharma)

नियाने लेहंगा घालून फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये ती लेहंग्यामध्ये दिसत आहे. यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या व्यतिरिक्त तिने कोणताच दागिना घातलेला नाही. यात रेड लिपस्टिकमध्ये ती आणखीनच सुंदर दिसत आहे. तिचे हे लूक्स चाहत्यांना भुरळ घातल्याशिवाय राहणार नाहीत.

निया निळ्या रंगाचा ड्रेस घालून सिंड्रेलासारखी दिसत आहे. तिचा हा लूक देखील बघण्यासारखा आहे. एखाद्या थीम पार्टीमध्ये तुम्ही ही स्टाईल ट्राय करू शकता.

https://www.instagram.com/p/CNE0HuMFjCx/?utm_source=ig_web_copy_link

तसेच निया काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये देखील बोल्ड दिसत आहे. तिने  काळ्या रंगाचा शॉर्ट ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे. तसेच पांढरे पम्प शूज घातले आहेत.

तसेच ती पांढऱ्या रंगाच्या थ्रेड वर्क साडीमध्ये देखील खूपच सुंदर दिसत आहे. या साडीवर तिने हल्टर नेक बॅकलेस ब्लाऊज परिधान केला आहे. या लूकमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. तसेच या साडीवर रेड लिपस्टिकने तिचा लूक खूपच हॉट दिसत आहे.

निया शर्माच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘काली: एक अग्नि परीक्षा’ या मालिकेतून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. स्टार प्लसवरील ‘एक हजारो में मेरी बहना हैं’ या मालिकेत तिने काम केले. त्यांनतर ती ‘जमाई राजा’, ‘इश्क में मरजावा’, ‘नागिन’ आणि ‘खतरों के खिलाडी 8’ यांमध्ये दिसली आहे. तसेच तिने विक्रम भट्ट यांच्या ‘ट्विस्टेड’ या वेबसीरिजमध्ये देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ओ पिया’, म्हणत ‘शालू’ने शेअर केला व्हिडिओ; काळ्या साडीमध्ये पाहायला मिळाल्या वेड लावणाऱ्या अदा

-हॉट व्हिडिओ शेअर करत मराठमोळी ऋतुजा बागवे म्हणतेय, ‘…माझ्यात तो टॅलेंट नाही’

‘क्रेझी किया रे’, प्रिया बापटच्या दिलखुलास स्मितवर चाहते झाले फिदा

हे देखील वाचा