Thursday, March 30, 2023

एकनाथ शिंदेंच्या मंचावरील श्रद्धा कपूरच्या मराठी भाषणाचीच सर्वत्र चर्चा; म्हणाली, ‘आपले एकनाथ शिंदे भाऊ…’

सध्या सर्वत्र दहीहंडीचा जल्लोश पाहायला मिळत असून कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षानंतर साजऱ्या होणाऱ्या या सणाचा तरुणाईमध्ये मोठा जल्लोश आणि उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांनी मोठमोठ्या दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले असून या कार्यक्रमांना सिने जगतातील अनेक दिग्गज अभिनेते तसेच अभिनेत्रींना आमंत्रित केले गेले आहे. सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती ठाण्यामधील दहिहंडीसोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मंचावर उपस्थित असलेली दिसत आहे. 

जन्माष्टमी हा हिंदू धर्माचा पवित्र सण आहे, या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यामुळेच दरवर्षी हा सण उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. या सणानिमित्त बॉलिवूड स्टार्सही वेगवेगळ्या पद्धतीने जन्माष्टमी साजरी करत आहेत. याच अनुषंगाने अभिनेत्री श्रद्धा कपूरही जन्माष्टमी साजरी करण्यासाठी दही-हंडी उत्सवात सहभागी होण्यासाठी गेली होती. यावेळी अभिनेत्री श्रध्दा कपूरने ठाण्यातील टेंभीनाकामधील दहिहंडी सोहळ्यात उपस्थिती दर्शवली.

स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या टेंभी नाक्यावरील दहिहंडी चांगलीच प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही या दहिहंडीशी विशेष नाते आहे. या कार्यक्रमाला श्रध्दा कपूरसह एकनाथ शिंदे यांनी आवर्जुन हजेरी लावली होती. या सोहळ्यात बालगोपाळांचा उत्साह पाहण्यासारखा होता. मात्र सर्वात जास्त चर्चा झाली ती अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या भाषणाची. अभिनेत्री श्रध्दा कपूरने या कार्यक्रमाला उपस्थिती लावत ठाणेकरांना खास मराठी भाषेत शुभेच्छा दिल्या, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.

आपल्या भाषणामध्ये श्रद्धाने “कसं कायं ठाणेकर, तुम्हा सर्व ठाणेकरांना नमस्कार,” असे म्हणत आपल्या भाषणाला सुरूवात केली. आपल्या भाषणात पुढे तिने, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सोबत आहेत. आणखी काय पाहिजे. दिघे साहेबांची दहिहंडी मोठी असते,असे ऐकलेलं. आज प्रत्यक्षात अनुभव घेतला. तुम्ही सगळे माझ्यावर इतकं प्रेम करता त्याबद्दल मी तुमची आभारी आहे,” असे म्हणत ठाणेकरांची मने जिंकली.

हेही वाचा –  पवन सिंग अन् आम्रपाली दुबेचे सर्वात बोल्ड गाणे व्हायरल, एक-दोन नाही, तर मिळालेत ‘एवढे’ कोटी हिट्स
आनंदाची बातमी! ‘साथ निभाना साथिया’मधील ‘ही’ अभिनेत्री दुसऱ्यांदा आई बनणार, हटके अंदाजात केली घोषणा
भारती सिंगचा मुलगा बनला बालगोपाळ, बापलेकाचा गोड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

 

हे देखील वाचा