हाय! श्रुती मराठेचा घायाळ करणारा नवीन लुक अन् मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो


‘राधा ही बावरी’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे. श्रुतीने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने महाराष्ट्रासोबतच साऊथ इंडस्ट्रीलाही वेड लावले आहे. अभिनयाच्या जोरावर तिने दाक्षिणात्यसृष्टीमध्ये तिचे स्थान अढळ केले आहे.

अभिनयासोबतच नृत्यातही पारंगत असणारी श्रुती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. श्रुती सतत तिचे वेगवेगळ्या वेषभूषेतले, वेगवगेळ्या स्टाइलचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

श्रुतीने नुकतेच तिचे साडीमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोना पाहून सर्वच तिच्या प्रेमात पडतील इतकी सुंदर दिसत आहे.

जांभळ्या रंगाच्या साडीत श्रुती खूपच सुरेख दिसत आहे. साधा तरीही आकर्षक असणारा तिचा हा नवीन लुक सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा विषय आहे. ‘Train ur mind to see good in every situation 🥰’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती ‘श्रुती प्रकाश’ या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना तिचे फॅन्स नेहमीच पसंतीची पावती पोचपावती देतात.

श्रुतीने या फोटोंसोबतच फोटोशूटचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. यात श्रुतीचं दिसणाऱ्या अदा, तिचे एक्सप्रेशन सर्वांचं घायाळ करत आहे.

श्रुतीने तमिळ सिनेमा ‘इंदिरा विजहा’ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिने मराठीमध्ये मुंबई पुणे मुंबई, सनई चौघडे आदी हिट सिनेमांमधून काम केले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.