आपल्या अभिनयाने घरोघरी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे शुभांगी अत्रे (Shubhangi Atre) ही सध्या ‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेत काम करताना दिसत आहे. तिच्या अंगूरी भाभी या पात्राने प्रेक्षकांना खळखळुन हसायला भाग पाडले. या कार्यक्रमात ती सलग पाच वर्षांपासून काम करत आहे. तिचे हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडत आहे. ती या शोमधील सगळ्यात लोकप्रिय पात्रापैकी एक आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने समाजातील महिलांची स्थिती आणि महिला सक्षमीकरणाविषयी सांगितले आहे. अभिनेत्री होण्याबरोबरच ती एक पत्नी आणि एका मुलीची आई आहे.
ती म्हणते, “एक महिला आणि आई म्हणून मी माझ्या मुलीसाठी असे वातावरण तयार केले आहे, ज्यामध्ये ती कोणत्याही पक्षपातावर उठून नवीन संधी मिळवू शकते. मला तिला मुक्त, सशक्त, उत्साही बनवायचे आहे आणि इतर महिलांनाही प्रोत्साहन द्यायचे आहे. परंतु समाजातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला तसे स्वातंत्र्य नाही. त्यामुळे अशा ठिकाणी कुठेतरी महिला मागे राहतात. आपण थोडा वेळ काढून मुलांशी बोलले पाहिजे. आपल्या घरातील काम करणारे असतील, त्यांच्याशी लिंग पूर्वाग्रहवरती बोलले पाहीजे. त्यामुळे त्यांना ही बाब गांभिर्याने समजेल आणि ते पुढे नेण्यास सक्षम होतील.”
मुलाखतीत महिला दिनाच्या शुभेच्छा देताना ती म्हणते, “या दिवशी मला एवढीच इच्छा आहे की, महिलांनाही पुरुषांच्या तुलनेत समान दर्जा मिळावा. आपल्याला ज्या दिशेने वाटचाल करायची आहे, त्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळाली पाहिजे.”
शुभांगी आता ४० वर्षीची आहे. तिने पियूष पुरीसोबत लग्न केले आहे. वयाच्या १९ वर्षी त्यांचे लग्न झाले होते. तिला आता १४ वर्षांची मुलगी आहे. ती मुळची मध्य प्रदेशमधील आहे. अभिनेत्रीने २००३ साली मिस मध्यप्रदेश किताब पटकावला. तिने तिच्या करियरची सुरूवात २००७ मध्ये केली. ‘कसौटी जिंदगी की’ मधून ती पहिल्यांदाच टीव्हीवर झळकली होती.
हेही वाचा
- फरदीन खानच्या मागे साईड मॉडेल म्हणून रॅम्प वॉक करणारी दीपिका आज करते बॉलिवूडवर राज्य तर फरदीन…
- आधुनिक विचाराच्या क्षेत्रात राहूनही ‘या’ अभिनेत्री ठरल्या घरगुती हिंसाचाराच्या बळी
- चित्रपट जगतात फ्लॉप ठरुनही फरदीन खान आहे कोट्यावधीचा मालक, जाणून घ्या त्याच्या कमाईचे साधन