Sunday, April 14, 2024

वहिनी ऐश्वर्याची ‘ही’ गोष्ट श्वेता बच्चनला अजिबात आवडत नाही, स्वतः केला खुलासा

अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावरही श्वेता ट्रोल होत आहे. श्वेताची मुलगी नव्याने नुकतेच पॅरिस फॅशन वीकमध्ये रॅम्पवर पदार्पण केले. ज्याचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे. ऐश्वर्या राय देखील या फॅशन वीकचा एक भाग होती. त्या व्हिडिओमध्ये श्वेताने ऐश्वर्याला टॅग केले नाही.त्यामुळे ती खूप ट्रोल झाली होती. ऐश्वर्या आणि श्वेता यांच्यात मतभेद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. एकदा श्वेताने ऐश्वर्याबद्दल तिला अजिबात आवडत नसल्याचा खुलासा केला होता.

अभिषेक बच्चन एकदा करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये त्याची बहीण श्वेतासोबत गेला होता. जिथे करणने श्वेताला ऐश्वर्याबद्दल प्रश्न विचारले.

करणने श्वेताला विचारले होते की तिला ऐश्वर्याबद्दल काय आवडते आणि तिला काय आवडत नाही. श्वेताने ऐश्वर्याबद्दल सांगितले की, ती सेल्फ मेड, मजबूत महिला आणि खूप चांगली आई आहे. त्याचबरोबर ऐश्वर्याचे टाइम मॅनेजमेंटही छान आहे. परंतु ती कॉल आणि मेसेजला लवकर रिप्लाय देत नसल्याने श्वेताला ते आवडत नसल्याचे तिने सांगितले होते.

नुकताच अमिताभ बच्चन यांनी त्यांचा 81 वा वाढदिवस साजरा केला. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या रात्री संपूर्ण कुटुंब एकत्र होते. श्वेताने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये नव्या, अगस्त्य, आराध्या आणि जया बच्चन दिसल्या होत्या. जेव्हा ऐश्वर्याने हा फोटो शेअर केला होता तेव्हा तिने सगळ्यांना क्रॉप केले होते आणि त्यात फक्त आराध्या आणि अमिताभ बच्चन दिसले होते. फोटोमध्ये आराध्या बिग बींना मिठी मारताना दिसली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

किशोर कुमार यांना आधीच लागली होती मृत्यूची चाहूल, म्हणूनच त्यांनी…
एका जाहीरातीमुळे बदलली ‘तिची’ जिंदगी! थेट मिळाली होती ऋतिक रोशनबरोबर काम करण्याची संधी

हे देखील वाचा