Saturday, January 25, 2025
Home भोजपूरी ‘पुष्पा’च्या श्रीवल्लीला भोजपुरी अभिनेत्रीने दिली जोरदार टक्कर, ‘सामी सामी’वर लावले जबरदस्त ठुमके!

‘पुष्पा’च्या श्रीवल्लीला भोजपुरी अभिनेत्रीने दिली जोरदार टक्कर, ‘सामी सामी’वर लावले जबरदस्त ठुमके!

‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जुनचे (Allu Arjun) डायलॉग आणि समंथा रुथ प्रभूचा (Samantha Ruth Prabhu) डान्स चांगलाच गाजला आहे. अशातच रश्मिका मंदान्नावर (Rashmika Mandanna) चित्रित केलेला ‘सामी-सामी’ देखील खूप ट्रेंड करत आहे. आता या गाण्यावर भोजपुरी अभिनेत्री श्वेता महारा (Shweta Mahara) हिने नॅशनल क्रशला जोरदार टक्कर दिली आहे.

‘पुष्पा: द राइज पार्ट १’ जबरदस्त ट्रेंड करत आहे आणि आता त्याच्या स्टारकास्टच्या अभिनयाची बॉलिवूडच्या सर्व सेलिब्रिटींनी प्रशंसा देखील केली आहे. एकीकडे अल्लू अर्जुनच्या डायलॉग्सचा सोशल मीडियावर बोलबाला आहे, तर दुसरीकडे समंथा रुथ प्रभूचा खास आयटम नंबरही तरुणांना वेड लावत आहे. यासोबतच चित्रपटाची मुख्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिच्यावर चित्रित केलेले ‘सामी-सामी’ हे गाणेही खूप ट्रेंड करत आहे. (shweta mahara dance of pushpa song saami saami)

मोनिका यादवच्या आवाजात गायलेले ‘सामी-सामी’ हे गाणे इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहे. अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांनी या गाण्यावर त्यांचे रील शेअर केले आहेत. अलीकडेच, भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता महारा हिने या गाण्यावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे श्वेता या व्हिडिओमध्ये रश्मिका मंदान्नाच्या गेटअपमध्ये कमाल दिसत आहे. तिने श्रीवल्लीच्या लूकमध्ये सामी-सामीवर डान्स केला आहे.

या व्हिडिओमध्ये, श्वेता नॅशनल क्रश रश्मिका सारख्याच आकर्षक अदा दाखवताना दिसत आहे. तिने रश्मिकाची कॉपी करून केसात गजराही लावला आहे आणि ती अप्रतिम डान्स मूव्ह्ज करताना दिसत आहे. श्वेताच्या या रीलला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे आणि चाहते तिच्या कातिलाना स्टाइलचे खूप कौतुक करत आहेत.

श्वेता दररोज तिच्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. याआधीही बॉलिवूडमधील अनेक गाण्यांवर डान्स करतानाचे तिचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. श्वेता तिच्या ‘मुझे कुछ कहना है’, ‘ट्यूशन टीचर’, खेसारी लाल यादव आणि शिल्पी राजच्या ‘लागेलू जहर’ या प्रसिद्ध गाण्यांसाठी ओळखली जाते.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा