Friday, June 14, 2024

अनुपमा अन् खेसारीलालच्या जोडीने घातला धुमाकूळ, जबरदस्त डान्स मूव्हज पाहून तुमचेही थिरकतील पाय

भोजपुरी अभिनेता खेसारीलाल यादव (Khesari lal yadav) हा ‘ट्रेंडिंग स्टार’ नावानेही ओळखला जातो. त्याच्या हिट म्युझिक व्हिडिओमुळे त्याला हे नाव देण्यात आले आहे. अभिनेत्याचे कोणतेही व्हिडिओ गाणे प्रदर्शित झाले, तर ते युट्यूबवर ट्रेंड व्हायला सुरू होते. त्याचवेळी त्याच्या अनेक गाण्यांमध्ये आजकाल तो भोजपुरी गायिका अनुपमा यादवसोबत (Anupama Yadav) दिसत आहे, जी तुफान व्हायरल होत आहेत. नुकताच या दोन्ही स्टार गायकांचा ‘सईया के रोटी’चा व्हिडिओ लाँच करण्यात आला होता. ज्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. दरम्यान, खेसारीने त्याचा आणखी एक नवीन व्हिडिओ प्रदर्शित केला आहे, ज्यात तो अनुपमासोबत एकत्र आला आहे. ‘गोल गोल रोटी’ हे त्याच्या नवीन गाण्याचे बोल आहेत.

‘गोल गोल रोटी’ या नवीन भोजपुरी गाण्यात खेसारी लाल अभिनेत्री राणीसोबत सुपरस्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. हे गाणे २८ नोव्हेंबर रोजी मेरा भोजपुरी चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे. या म्युझिक अल्बममध्ये खेसारी डोक्यावर स्कार्फ बांधलेला बनियान आणि धोतराच्या स्टाईलमध्ये दिसत आहेत. अनुपमा-खेसारी यांनी साकारलेल्या या गाण्याची सुरुवात ‘पहले से ज्यादा लगे न चॉकलेटी…’ अशी आहे.

या गाण्यात खेसारी आपल्या असामान्य स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे, तर त्याची सहकलाकार अभिनेत्री राणी तिच्या बोल्ड मूव्हज दाखवत आहे. व्हिडिओमध्ये ‘लिट्टी चोखा’ फेम खेसारी अप्रतिम दिसत आहे. मात्र, गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसणारी राणी तिच्या गेटअपमध्ये चाहत्यांचे लक्ष वेधण्यात कमी पडली आहे.

यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘सईया के रोटी’ या गाण्याने तर कमालच केली. या गाण्याच्या व्हिडिओला आतापर्यंत ३२ लाखांपर्यंत व्ह्यूज मिळाले आहेत.

हे गाणे अनुपमाने हाय म्युझिक बीटवर गायले आहे. त्यामुळे आगामी काळात हे गाणे ब्लॉकबस्टर ठरेल अशी अपेक्षा आहे. यापूर्वी खेसारी लाल आणि अनुपमा यांचे रोमँटिक गाणे ‘लग जाई आग’ प्रदर्शित झाले होते, ज्यावर त्यांच्या चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-साराच्या सिक्युरिटी गार्डने पॅपराजीसोबत केले ‘असे’ काही की, संतापली अभिनेत्री; माफी मागत जिंकली मने

-इमरान हाश्मीच्या ‘लुट गए’ गाण्याची क्रेझ आफ्रिकेतही, ‘या’ जोडप्याने गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल

-भयावह! ‘छोरी’ फेम नुसरतसोबत घडली विचित्र घटना, ३० सेकंदात सोडावं लागलं अभिनेत्रीला हॉटेल

हे देखील वाचा