Tuesday, December 23, 2025
Home बॉलीवूड तेलुगु अभिनेत्रीने ‘सैंया जी’ गाण्यावर केला भन्नाट डान्स; सोशल मीडियावर चाहते झाले घायाळ, पाहा व्हिडिओ

तेलुगु अभिनेत्रीने ‘सैंया जी’ गाण्यावर केला भन्नाट डान्स; सोशल मीडियावर चाहते झाले घायाळ, पाहा व्हिडिओ

अभिनेत्री आलेख्या हरिका तेलुगु सिनेसृष्टीतील एक मोठ्ठं नाव आहे. हरिकाने तेलुगु बिग बॉस ४ मध्ये टॉप ५ मध्ये पोहोचून यशाला गवसणी घातली आहे. तिच्या प्रसिद्धीमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. सोशल मीडियावरही तिचा चांगला चाहतावर्ग आहे. इंस्टाग्रामवर तिचे ९ लाख फॉलोवर्स आहेत, तर यूट्यूबवर तिचा ‘ढेठाडी हरिका’ या चॅनेलला १६ लाखांपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स आहेत. हरिका आधी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होती, परंतु तिने ती नोकरी सोडून आपल्यातील प्रतिभा ओळखली आणि एक नवी ओळख निर्माण केली आहे.

सध्या ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

हरिका या व्हिडिओमध्ये गायक हनी सिंग आणि गायिका नेहा कक्करच्या ‘सैंय्या जी’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. तिचे डान्स मुव्ह पाहून चाहते घायाळ झाले आहेत. या गाण्यावरील तिचा अत्यंत आकर्षक डान्स आतापर्यंत ५२ हजारांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हरिकाने सोशल मीडिया आणि यूट्यूबवरून ओळख निर्माण केली आणि त्यानंतर तिने सन २०१९ मध्ये ‘आदित्य वर्मा’ सिनेमातून अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली. हा ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगु चित्रपटाचा रिमेक होता. याच चित्रपटाचा रिमेक ‘कबीर सिंग’ हा चित्रपटही आहे.

हरिकाने एका मुलाखतीत ‘आदित्य वर्मा’ चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल म्हटले होते की, ती भूमिका जरी छोटी असली, तरी तिला त्यामधूनच ओळख मिळाली. तिला यापूर्वी तिच्या उंचीमुळे अनेकवेळा नाकारण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

हॅप्पी बर्थडे! हॉट आणि बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्राने केलेले ३ धक्कादायक खुलासे, ज्यांनी बॉलिवूडमध्ये घातला होता धुमाकूळ

डायरेक्टरने प्रियांका चोप्राला दिला होता सर्जरी करून फिगर ठीक करण्याचा सल्ला; अभिनेत्रीने आपल्या पुस्तकात केला धक्कादायक खुलासा

वाढदिवस विशेष! इंजिनियरिंगचे शिक्षण सोडून कुमार विश्वास बनले ‘कवी’, ‘चाय गरम’ चित्रपटात केला होता अभिनय

सुंदरता असावी तर अशी! जब्याच्या शालूने शेअर केले भन्नाट फोटो, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

‘मी अजूनही जुनीच…’, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षे पूर्ण करणाऱ्या तब्बूचे वक्तव्य

-आनंदाची बातमी! अभिनेत्री अनिता हसनंदानीने दिला मुलाला जन्म; पतीने शेअर केला फोटो

-कल्पनाचे ‘फूलौरी बिना चटनी’ गाणे झाले रिलीज, एकाच दिवसात मिळाले जबरदस्त व्ह्यूज

हे देखील वाचा