श्वास रोखून धरा! दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश होणार ‘दुल्हनिया’?, ‘या’ संगीतकारासोबत घेणार फेरे


सध्या बॉलिवूडसोबत संपूर्ण मनोरंजन सृष्टीमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक कलाकारांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अनेक कलाकारांनी लगीनगाठ बांधली आहे. मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे अनेक कलाकारांनी त्यांची लग्ने पुढे ढकलली होती. मात्र, आता यावर्षी एकीकडे कोरोना संकट कमी होत असताना दुसरीकडे कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. आता या यादीत एक नवीन नाव आले आहे.

ते नाव म्हणजेच दाक्षिणात्य अभिनेत्री ‘कीर्ती सुरेश’. प्राप्त माहितीनुसार कीर्ती लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ती प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या आहेत.

मात्र, अजूनपर्यंत या दोघांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली, तरी लग्नाच्या चर्चा जोरदार रंगताना दिसत आहेत. कीर्ती दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर देखील भरपूर सक्रिय असते. तिला लाखो फॅन्स फॉलो देखील करता. तिच्या फॅन्सला तिचा साऊथ इंडियन लुक सर्वात जास्त आवडतो.

कीर्ती आणि अनिरुद्ध आधीपासूनच एकमेकांना ओळखतात. त्यांनी ‘रेमो, ‘थाना सेरधा कूटम’ आणि ‘अग्नयाथवसी’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम देखील केले आहे. यादरम्यानच ते एकमेकांना डेट करत असल्याच्या देखील बातम्या आल्या होत्या.

अनिरुद्ध रविचंदर सोबतच्या लग्नाच्या चर्चांआधी ती एका राजकीय नेत्याच्या मुलासोबत लग्न करणार आणि अभिनयाला रामराम ठोकणार असल्याच्या बातम्यांनी जोर धरला होता. पण कीर्तीने या सर्व बातम्यांना अफवा असल्याचे सांगितले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! रवीना टंडनचा नवरा होता फराह खानचा स्लीपिंग पार्टनर, ‘या’ कारणामुळे दोघे झोपायचे एकाच बेडवर
-इंजिनीअरिंग केल्यानंतर वळला होता मॉडेलिंगकडे, कष्ट करून मिळवली लोकप्रियता, वाचा संदीप नाहरचा संघर्षमय प्रवास
-‘आपण दोघी जॅकीसोबत लग्न करू आणि बहिणीसारख्या राहू’, जॅकी श्रॉफ यांच्या बायकोने त्यांच्या गर्लफ्रेंडला लिहिले होते पत्र, वाचा तो किस्सा
-ऋषी कपूर यांच्यासोबत पदार्पण केलेल्या ‘या’ अभिनेत्रीला, ‘हम पांच’ने दिली खरी ओळख, वाचा तिच्या प्रवासाबद्दल
-याला म्हणतात खरे प्रेम! ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने चाहत्याने उभारले ‘या’ अभिनेत्रीचे मंदिर, घातला दुधाने अभिषेक


Leave A Reply

Your email address will not be published.