Monday, July 1, 2024

खुशखबर! कट्यार घुसली काळजात 2 लवरच…, सुबोध भावेने शेअर केली पोस्ट

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता सुबोध भावे यांचा यांचे अने चित्रपट गाजले आहेत. मराठी चित्रपटातील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून सोबोध भावेकडे पाहिले जाते तोणतीही भूमिका आसो किंवा कोणताही अभिनय असो त्याने नेहमीच आपली धमक त्या भूमिकांमध्ये धाकवली आहे. त्याचा ‘कट्यार काळजात घुसली‘ हा चित्रपट 2015 सलाी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांवर वेगळीच छाप सोडली होती, आजही हा चित्रपट लोक आवर्जून पाहात असतात. चित्रपटाला 7 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल सुबोधने पोस्ट शेअर करत मोठी घेषणा केली आहे.

अभिनेता सुबोध भावे ( Subodh Bhave) याचा ‘कट्यार काळजात घुसली’ हा प्रसिद्ध चित्रपट 2015 साली प्रदर्शित झाला असून याला 7 वर्ष वूर्ण झाले आहेत. या चित्रपटामध्ये सुबोधने मुख्य भूमिका निभवली असून त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. त्यामुळे अभिनेत्याचा हा चित्रपट खूपच जवळचा आहे. 1967 साली मराठी रंगभूमिवर ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाचे लेखन पुरुषोत्तम दारवेकर (Purushottam Darvhekar) यांनी लेखन केले असून ते आजरामर झाले होते. मात्र, दर्जा चित्रपटानेही राखला. अभिनेत्याच्या मनाजवळच्या चित्रपटाला सात वर्ष पुर्ण झाल्याबद्दल त्याने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट द्वारे मोठी घोषणा केली आहे.

सुबोधने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत लिहिले की, ”कट्यार काळजात घुसली.. 12 नोव्हेंबर 2015.. एका संगीतमय आनंददायी प्रवासाचे सातवे वर्ष. संगीत माणसं जोडतं आणि आनंद निर्माण करतं! अजून एक आनंददायी संगीतमय प्रवास पुढील वर्षी. तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद.. ” त्याने या पोस्टद्वारे प्रेक्षकांना आनंदाची बातमी देत सांगितले आहे की, तो लवकरच सांगीतिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीली आनणार आहे.

 

View this post on Instagram

 

सुबोधच्या या पोस्टनंतर चित्रपट पूर्वीच्या चित्रपटाचाच दुसरा भाग असेल का? असा प्रश्न अनेक प्रेक्षकांना लागला आहे त्यासोबतच जरी नावीन भाग बनत असेल तर, यामध्ये कोणता अभिनेता मुख्य भूमिकेत असेल किंवा कोणते कोणते कलाकार चित्रपचामध्ये असतील असे अने प्रश्न प्रेक्षकांना सुचत आहेत. पूर्वी कट्यारमध्ये मुख्य भूमिकेत सूबोधसोबत संगितकार शंकर महादेवन (Shankar Mhadevan), सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar), अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) सारखे दर्जेदार कलारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या

त्यामुळे सुबोध भावे याच्या पोस्ट सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. आता प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट पाहाण्यासठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आलिया-रणवीरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची रिलीज डेट जाहीर; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
जया बच्चन यांंनी सांगितला मासिक पाळीचा अनुभव; म्हणाल्या, ‘झाडामागे जाऊन…’

हे देखील वाचा